vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मोदी सरकार पुढील दीड वर्षात 10 लाख नोकर्‍या देण्याच्या तयारीत; PM Narendra Modi यांचे मंत्रालयांना निर्देश

मोदी सरकार पुढील दीड वर्षात 10 लाख नोकर्‍या देण्याच्या तयारीत; PM Narendra Modi यांचे मंत्रालयांना निर्देश…..

नवी दिल्ली प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेमुळे तरूनांमध्ये नवा जोश येईल असे ट्वीट करत अमित शाह म्हणाले आहेत.

नोटाबंदी, कोरोना संकट यामुळे अनेकांच्या नोकर्‍यांवर गदा आली. आर्थिक घडी देखील विस्कटलेली आहे. देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत असताना आज केंद्र सरकार कडून या परिस्थितीत एक आशेचा किरण दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिशन मोड वर पुढील दीड वर्षात 10 लाख नोकर्‍या देण्यासाठी कामाला लागण्याचे निर्देश दिले आहे. आज विविध मंत्रालयांना आणि सरकारी विभागांना हे निर्देश देण्यात आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मंत्रालयाच्या ह्युमन रिसॉर्स विभागाचा आढावा घेतला आहे अशी माहिती PMO कडून देण्यात आली आहे.

देशातील बेरोजगारीच्या प्रश्नावरून सातत्याने सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. त्यावरूनच आता सरकारने हा निर्णय घेतला आहे. देशात अनेक सरकारी कार्यालयांमध्ये पदं रिक्त आहेत. त्याचे आकडे समोर देखील आणण्यात आले आहेत. त्यावरून आता मोदींनी ह्युमन रिसॉर्स चा आढावा घेत मिशन मोड वर पदं भरण्यासाठी प्रयत्न करावेत असे सुचवल्याचे ट्वीट करून सांगण्यात आले

मागील वर्षी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ८.७२ लाख पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदे आहेत, त्यापैकी सुमारे ३१ लाख ३२ हजार कर्मचारी नियुक्त आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेमुळे तरूनांमध्ये नवा जोश येईल असे ट्वीट करत अमित शाह म्हणाले आहेत.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये,लवकरात लवकर लागू करावेत कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक,एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका

नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण-नगराध्यक्षासाठी २३ तर नगरसेवकसाठी ३३९ उमेदवारांचा निकाल होणार स्पष्ट..

vishwatmaklokswamivarta

नवी दिल्लीत 14 ते 27 नोव्हेंबर कालावधीत 44 वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा· ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेसह जागतिक व्यापार,संस्कृती आणि नवकल्पनांचा भव्य उत्सव

vishwatmaklokswamivarta

पावसा मुळे! मुंबईत आज सकाळच्या सत्रातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी..

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग मध्ये मोठा स्फोट दिल्ली हादरली आठ मृत्युमुखी 24 जण जखमी. मुंबई ,उत्तर प्रदेश ,गुजरात हाय अलर्ट…

vishwatmaklokswamivarta