vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

भारतीय महिला क्रिकेटपटू तानिया भाटिया हिच्या सामानाची लंडनमध्ये चोरी; सोशल मीडियावर दावा

भारतीय महिला क्रिकेटपटू तानिया भाटिया हिच्या सामानाची लंडनमध्ये चोरी; सोशल मीडियावर दावा..

 

भारतीय महिला क्रिकेट  संघाची यष्टिरक्षक-फलंदाज तानिया भाटिया हिने सोमवारी (26 सप्टेंबर) सोशल मीडियावर दावा केला की लंडन येथे तिच्या सामानाची चोरी झाली. टीम इंडियाच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर होती. या वेळी हा संघ मुक्कामी असलेल्या लंडन येथील हॉटेलमध्ये तिसे सामान लुटण्यात आले.

 

भारतीय महिला क्रिकेट (India Women’s Cricket Team) संघाची यष्टिरक्षक-फलंदाज तानिया भाटिया (Taniya Bhatia) हिने सोमवारी (26 सप्टेंबर) सोशल मीडियावर दावा केला की लंडन येथे तिच्या सामानाची चोरी झाली. टीम इंडियाच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर होती. या वेळी हा संघ मुक्कामी असलेल्या लंडन येथील हॉटेलमध्ये (Marriot Hotel London) तिसे सामान लुटण्यात आले. तानिया भाटिया (India women’s cricketer Taniya Bhatia) 10 ते 24 सप्टेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या T20I आणि ODI मालिकेसाठी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग होती.

 

सोशल मीडियावर सोमवारी संध्याकाळी आपल्या ट्विटर हँडलवरुन तिने दोन ट्विट केले. ज्यात तिने तिच्यासोबत घडलेली कहाणी कथन केली. तानियाने दावा केला की “कोणीतरी” लंडन हॉ मॅरियट टेलमध्ये तिच्या खोलीत घुसले आणि तिचे सामान चोरले. यात रोख रक्कम आणि दागिण्यांचा समावेश आहे. तानियाने तिच्या ट्विटमध्ये भारतीय संघाला पुरवण्यात आलेल्या खराब सुरक्षेबद्दल ईसीबीवर टीका केली

ट्विटमध्ये तिने म्हटले आहे की, हॉटेल मॅरियट मध्ये मझ्यासोबत घडलेल्या घटनेमुळे मला धक्का बसला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा एक भाग म्हणून मी दौऱ्यावर असताना आम्ही हॉटेलमध्ये मुक्कामी होतो. या वेळी कोणीतरी व्यक्ती माझ्या खोलीत घुसली. त्यांनी माझ्याकडी साहित्य (रोख, कार्ड, घड्याळे आणि दागिन्यांसह) माझी बॅग चोरली. घडल्या प्रकारामुळे मला असुरक्षीत वाटत असल्याचेही तिने म्हटले आहे.

 

संबंधित पोस्ट

सौरव घोषाल आणि तेजस्वीन शंकर यांनी रचला इतिहास, 6व्या दिवशी भारताने 5 पदकं जिंकली..

राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात खेळासह विविध कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारताचा क्रिकेट वीर विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; आयसीसीकडून ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच’ 2023 या पुरस्काराने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

आजपासून सुरू होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया2023 मध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना .

गुणवंत खेळाडु विद्यार्थ्यी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम