vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम

रायगड, प्रतिनिधी

हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक २९ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विविध क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यात क्रीडा व खेळांचा प्रसार व्हावा, युवक-युवतींमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्मिती व्हावी तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविला जाणार आहे.२९ ऑगस्ट, सकाळी १० वाजता जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य क्रीडा पुरस्कारार्थी तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा भव्य सत्कार.

३० ऑगस्ट – विविध शाळांमधून क्रीडा स्पर्धांचे आयोजन. तसेच संघटनांच्या माध्यमातून चर्चासत्र व परिसंवाद.३१ ऑगस्ट, अलिबाग येथे – भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित. यामध्ये १५ वर्षाखालील मुले-मुली, १८ वर्षाखालील मुले-मुली, खुला गट (पुरुष व महिला) तसेच वरीष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश असेल.स्पर्धकांना प्रमाणपत्रे तर विजेत्यांना आकर्षक ट्रॉफीज देण्यात येणार आहेत.

 राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने खेळाडूंनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

सेपाक टाकरा खेळ जालना जिल्ह्याच्या गावांगावात पोहोचवीणार – मंगलाताई पाटीलजिल्हास्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धा उत्साहात संपन्न..

खेळाडूंना ५% आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यन्वित२४ तासांत डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र

गाझीपूर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 175 वजनी गटात ठाण्याच्या सुश्मिताने पटकावले कांस्यपदक

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धा नामांकनासाठी स्किल कॉम्पीटीशन

vishwatmaklokswamivarta

ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराचा समारोप; 300 खेळाडूंनी घेतले .क्रीडा व मानसिक विकासाचे धडे..