vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र बचत गटांना उपस्थित राहण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र बचत गटांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

 

 

व्यावसायिक प्रतिनिधी- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात. तरी बुधवार दि. 9 ऑक्टोंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये पात्र बचतगटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी लॉटरी पध्दतीने बचतगटांची निवड करण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अनंत कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

सन 2023-24 या आर्थिक वर्षातील सदर योजनेंतर्गत एकुण दहा मिनी ट्रॅक्टरचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज मागविण्यात आले. पात्र असलेल्या बचतगटांपैकी उद्दीष्टाच्या अनुषंगाने दहा बचतगटांची निवड करावयाची आहे. बचतगटांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. सदर बचतगटांची अंतिम पात्र व अपात्र यादी कार्यालयाच्या सुचनाफलकावर डकविण्यात आलेली आहे. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेंतर्गत लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड करण्यात येणार आहे. असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांसाठी हरित ऊर्जेवर चालणारे फिरते दुकान मिळणार…

vishwatmaklokswamivarta

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर युवा,महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रे  – निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव

जिल्ह्यातील १ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यासोबत उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

जिल्हाप्रशासन देणार शेतकऱ्यांना ‘हात मदतीचा’