vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नवदुर्गा माता देवी मुर्ती ‍विसर्जनासाठीशनिवारी शहरातील वाहतूकीच्या मार्गात बदल..

नवदुर्गा माता देवी मुर्ती ‍विसर्जनासाठीशनिवारी शहरातील वाहतूकीच्या मार्गात बदल..

 

राज्य प्रतिनिधी- जालना शहरात नवदुर्गा माता देवी मुर्ती विसर्जनासाठी जात असतांना मंडळांना मुर्ती विसर्जनासाठी अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यादृष्टीने शनिवार, दि.12 ऑक्टोबर, 2024 रोजी वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याचे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.

 

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये नवदुर्गा माता देवी मुर्ती विसर्जनासाठी वाहतूकीचे नियमन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून टांगा स्टॅण्ड, सराफा बाजार, पाणी वेस, सुभाष चौक मार्गे जुना जालन्यात जाणारी वाहतूक ही शिवाजी पुतळा, मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीज समोरील पुलावरुन एमएसईबी कार्यालय, मंमादेवी मंदीरकडून रेल्वे स्टेशन व जुना जालन्यात जाईल. तसेच जुना जालन्यातून नवीन जालन्यात येणारी वाहतूक ही याच मार्गाचा अवलंब करतील.

 

सदर बाजार, रहेमान गंज, मुर्गी तलावाकडून मामा चौक, सुभाष चौक मार्गे जुना जालन्यात जाणारी वाहतूक ही जुना मोंढा कमान, दीपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कडकोट, शिश टेकडीमार्गे जाईल. तसेच जुना जालन्यातून नवीन जालन्यात येणारी वाहतुक सुध्दा याच मार्गाचा वापर करेल.

 

छत्रपती संभाजीनगरकडून जालनामार्गे अंबड व मंठाकडे जाणारी वाहतूक ही जालना, गेडर टी पॉईंट, राजुर चौफुली, नवीन मोंढा, कन्हैय्या नगर बायपास रोडने नाव्हा चौफुली, मंठा चौफुली व अंबड चौफुली मार्गे जाईल. तसेच अंबड मंठा व नाव्हाकडून येणारी व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक ही अंबड चौफुली, मंठा चौफुली, नाव्हा चौफुली, कन्हैय्या नगर, नवीन मोंढा, राजुर चौफुली, गेडर टी पाँईंट मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल.

 

भोकरदन व राजुर रोडने येणारी व अंबडकडे जाणारी वाहतुक ही गेडर टी पॉईंट मार्गे न जाता राजूर चौफुली नवीन मोंढा, कन्हैय्या नगर बायपास रोडने नाव्हा चौफुली, मंठा चौफुली व अंबड चौफुली मार्गे जाईल. हे आदेश दि.12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून नवदुर्गा माता देवी मुर्ती विसर्जनापर्यंत लागू राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपचाचं चेहरा निश्चित, दोन्ही मित्रपक्षांच्या प्रमुखांना उपमुख्यमंत्री पद..

vishwatmaklokswamivarta

कोकणाचा जलदगतीने विकास करण्यासाठी रस्ते, महामार्ग उभारणार *– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमीनीचा प्रस्ताव सादर करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

नांदगाव व बखारी येथील प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव सादर करावा- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

महिंद्रा कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली दोन नवीन इलेक्ट्रिक वाहने- लाँच केली आहेत.

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी31 डिसेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta