vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी31 डिसेंबरपर्यंत मुदत

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी31 डिसेंबरपर्यंत मुदत

       अमरावती, प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2023-24 या पाच वर्षांच्या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तातडीने निकाली काढण्याची सूचना समाज कल्याण विभागाने दिली आहे. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले हे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानंतर प्रलंबित राहणाऱ्या अर्जांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची असेल, असा कळविण्यात आले आहे.

      सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी-परीक्षा फी माफी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती यांसारख्या विविध योजना राबविल्या जातात. मात्र, अनेक महाविद्यालयांनी वारंवार सूचना देऊनही जुन्या वर्षांचे अर्ज अद्याप निकाली काढलेले नाहीत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत केंद्र हिस्सा अदा करता येणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थी पात्र असूनही केवळ महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील, त्यांच्याकडून कोणतेही शुल्क वसूल करता येणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

     समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी आवाहन केले आहे की, महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची त्रुटीपूर्तता करून घ्यावी. ज्या अर्जांची त्रुटीपूर्तता होणे शक्य नाही, ते अर्ज नियमानुसार ‘रिजेक्ट’ करावेत. सन 2024-25 आणि 2025-26 या शैक्षणिक वर्षांचे शंभर टक्के अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी महाविद्यालयातील सूचना फलक, व्हॉट्सॲप ग्रुप आणि ‘समान संधी केंद्रा’चा प्रभावी वापर करावा. मुदतीनंतर महाडीबीटी ॲडमिनकडून अर्ज ‘ऑटो रिजेक्ट’ झाल्यास त्याची जबाबदारी प्राचार्यांची निश्चित केली जाईल, असेही या कळविण्यात आले आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना देणार भेट

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील 19 हजार शेतकऱ्यांना 142 कोटींची अधिकची कर्जमुक्ती; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून निधी जमा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

सामाजिक समता सप्ताहानिमित्त जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबिर व मेळावा संपन्न

नवी मुंबई महानगरपालिकेत दि. 25 ऑगस्ट रोजी, सायं. 4.30 वा. नमुंमपा मुख्यालयात श्रीगणेशोत्सव नियोजन बैठक