vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

चारचाकी वाहनांकरिता 1 जुलैपासून नवी मालिका…

चारचाकी वाहनांकरिता 1 जुलैपासून नवी मालिका…

         सांगली, प्रतिनिधी: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करिता नव्याने नोंदणी होणाऱ्या चारचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई आर ही नवीन मालिका मंगळवार, दि. 1 जुलै 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. ही माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

एम एच 10 ई आर या मालिकेव्यतिरीक्त इतर वाहनांकरिता आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत – आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे.

पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहित शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 2 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचा डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मेरा रेशम मेरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्रबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे निर्देश

मराठवाडा पाणी प्रश्नाबाबत जलसंवादचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

व्यवसायातील समस्या व कराच्या बोजावर गंभीर चर्चामराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या संचालक मंडळाची बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta