vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

चेंबूरचे टिळकनगर अदानी विद्युत बिल केंद्र असुविधाग्रस्त , ग्राहक हैराण

 चेंबूरचे टिळकनगर अदानी विद्युत बिल केंद्र असुविधाग्रस्त , ग्राहक हैराण

सुरेश गायकवाड प्रतिनिधी

मुंबई प्रतिनिधी : मुंबई- चेंबूरचे टिळकनगर अदानी विद्युत बिल केंद्र असुविधाग्रस्त असल्याने विद्युत बिल भरण्यासाठी ग्राहकांना तास – नतास उभे राहावे लागते आहे . अशा विद्युत बिलासाठी ग्राहकांना हैराण करून सोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले .

      अशा अदानी विद्युत बिल केंद्रावर विद्युत बिल भरण्यासाठी वयोवृद्ध महिला , पुरुष , लहान मुले येत असतात. मात्र , तेथे उपलब्ध असणाऱ्या विद्युत केंद्रातील बहुतांश वेळा मशिनस बंद असतात. त्यामुळे ग्राहकांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते . अशा वेळेस कुणा ग्राहकांना भोवळ येऊन काही अनुचित घटना घडल्यास त्यावेळी अदानी विद्युत विभागाला जाग येणार का? असा सवाल ग्राहक विचारणा करता आहेत.

       ह्या अदानी विद्युत बिल केंद्रावर एकच महिला वा पुरुष कर्मचारी काम करीत असतो. अशावेळेस विदयुत बिल भरणासाठी ग्राहकांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या असतात . परंतु त्या ग्राहकांच्या सुविधांविषयी कसलाही विचार केला जात नसल्याचे दिसून येते आहे .

       ह्या अदानी विदयुत बिल केंद्रावर विद्युत भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना काही सूचना वा तक्रारी करावयाची असल्यास तेथील सिक्युरिटि गार्डला विचारले असता आपणांस कसलीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले .

       एवढेच नव्हे तर अदानी विद्युत केंद्राच्या विद्युत बिल सुविधाविषयी संबंधित अधिकारी कोण आहे याविषयी विचारणा केली असता अदानीने हे विद्युत बिलं केंद्र खाजगी ठेकेतरांना दिले असल्याचे सांगितले . त्यामुळे अदानी विद्युत विभागाचा आणि आमचा कसलाही संबंध नसल्याचे तेथील अधिकाऱ्याने सांगितले .

      एकंदरीत अदानी विद्युत बिल केंद्रावर विद्युत बिल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना चांगल्यात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अदानी विद्युत विभागाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा ग्राहक करता आहेंत . त्यांच्या या अपेक्षाची दखल अदानी विद्युत विभागाने न घेतल्यास ग्राहक तक्रार मंच आणि या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन ठोस कारवाई करावी असे ग्राहकांचे म्हणणे आहे .

संबंधित पोस्ट

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्या बँड स्टॅन्ड बांद्रा येथील बंगला मन्नतमध्ये घुसल्यादोन अनोळखी व्यक्ती…

सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार*

अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा अभिषेक सोहळा याचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त पूजा अर्चना करून प्रसाद वाटप भाजपाने धारावी विभागात केले

vishwatmaklokswamivarta

सैन्य दलातील अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी …

vishwatmaklokswamivarta

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

ठाण्याचा नेमबाज रुद्रांक्ष पाटील सन 2022-23शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा मानकरी..