
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्या बँड स्टॅन्ड बांद्रा येथील बंगला मन्नतमध्ये घुसल्यादोन अनोळखी व्यक्ती…
मुंबई प्रतिनिधी
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुंबई शहरातील वांद्रे येथील याच्या मन्नत बंगल्यात दोन अनोळखी व्यक्ती घुसल्या. सदर दोघांवर बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या सुरक्षेत मोठी चुक झाल्याचे पुढे आले आहे. मुंबई शहरातील वांद्रे येथील शाहरुख खान याच्या मन्नत बंगल्यात दोन अनोळखी व्यक्ती घुसल्या. सुरक्षा अथवा इतर कोणतेच संकेत न पाळता या व्यक्तींनी थेट मन्नतचा तिसरा मजला गाठला. ही घटना गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, या व्यक्ती गुजरातमधील सूरत येथील दोन युवक आहेत. खरेतर मन्नत बाहेर आणि आतमध्येही सुरक्षारक्षकांचा मोठा ताफा असतो. अत्यंत कडेकोट सुरक्षा असूनही या दोघांनी सुरक्षारक्षकांना चकवा कसा दिला? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे
शाहरुख खान याच्या बंगल्यात बेकायदेशीरपणे घुसलेले हे लोक चक्क तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले. तेव्हा कुठे सुरक्षारक्षकांना त्यांचा संशय आला आणि त्यांनी या दोघांना रोखले. दोघांनाही पकडून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही युवकांचे वय अनुक्रमे 21 आणि 25 वर्षे आहे. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, कोणाच्याही बंगल्यात विनापरवानगी घुसणे तसेच इतर आरोपांखाली भारतीय दंड संहितेतील विविध कलमांनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे



