vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या माध्यम कक्षातील-अधिकारी-कर्मचाऱ्यांची दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक संपन्न

ठाणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या माध्यम कक्षातील-अधिकारी-कर्मचाऱ्यांची दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक संपन्न

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात माध्यम कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या माध्यम कक्षांशी समन्वय साधण्यासाठी ‘एकत्रित माध्यम व प्रमाणीकरण कक्ष’ हा जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यान्वित करण्यात आला असून सर्व माध्यम कक्षांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी, एकत्रित माध्यम कक्ष व माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव मनोज शिवाजी सानप यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न झालेल्या बैठकीत ‍दिल्या.

 

माध्यम कक्षाच्या माध्यमातून दैनंदिन वर्तमानपत्रात येणारी संबंधित विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात आलेल्या बातम्यांच्या कात्रणांची दैनंदिन फाईल करणे, स्वीपच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या जनजागृतीपर वृत्त तयार करुन ते प्रसारमाध्यमांना पाठविणे, संशयित पेड न्यूजवर लक्ष ठेवणे व संशयित पेड न्यूज निदर्शनास आल्यास त्या प्रमाणिकरण करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयास पाठविणे. स्थानिक पातळीवर प्रकाशित होणाऱ्या निवडणुकांविषयीच्या बातम्यांवर लक्ष ठेवणे. नामनिर्देशन अर्ज सादर करावयास येणाऱ्या उमेदवारांचे छायाचित्र काढण्यासाठी छायाचित्रकारांची नेमणूक करणे. स्थानिक प्रसारमाध्यमांना ते फोटो व व्हिडिओ उपलब्ध करून देणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची बातमी/ माहिती तसेच फोटो व व्हिडिओ तयार करण्यात यावेत. स्थानिक प्रसारमाध्यमांबरोबर समन्वय साधणे. निवडणूक संबधीत अहवालांसाठी आपापल्या मतदारसंघाची माहिती सादर करणे, निवडणूक प्रक्रिया व निवडणूक यंत्रणा आदीबाबत नकारात्मक, दिशाभूल करणारी बातमी प्रसारित होत असल्यास तात्काळ आपल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे. सोशल मीडियाचे सनियंत्रण, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आदी समाज माध्यमांवरील निवडणूक प्रचार, आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष ठेवणे आदी सूचना सर्व विधानसभा मतदारसंघातील नोडल अधिकारी, जनसंपर्क अधिकारी व माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या.

 

यावेळी आपल्या प्रास्ताविकात माहिती अधिकारी व नोडल अधिकारी नंदकुमार वाघमारे व ठाणे महानगरपालिकेच्या सहायक जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांनीही माध्यम कक्षाचे कामकाज याविषयी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना उपयुक्त माहिती दिली.

 

या बैठकीस ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन अय्यर, जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे, सचिन काळुखे, स्वरूप हुले, नमन खत्री, महेंद्र पटेल हे तसेच सर्व विधानसभा मतदारसंघातील माध्यम कक्षाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

मुंबई वाहतूक पोलिसांनी 1 ऑगस्ट 2024 ते जुलै 2026 या कालावधीत हा पूल बंद राहणार आहे. सायन धारावी पुलावरील वाहतूक जुलै 2026पर्यंत बंद, असे असतील पर्यायी मार्ग

महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बांद्रा येथील बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला धारावी विभागातूनही दहा ते पंधरा हजार शिवसैनिक येण्याची शक्यता… 

पुर्णा मध्यम प्रकल्प ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावितशेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तीव्र प्रतिक्रिया; अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी तात्काळ पुढाकार,उपसभापती कार्यालयात अर्पण करण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार-2023-24 प्राथमिक छाननी अहवालात,केलेल्या पुरस्कार गुणांकनाबाबत आक्षेप किंवा सूचना 18 फेब्रुवारी पर्यंत सादर कराव्यात

vishwatmaklokswamivarta