vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर सचिवपदी उदयोजक श्रीकांत नायक यांची वर्णी …

 राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर सचिवपदी उदयोजक श्रीकांत नायक यांची वर्णी …

 

 मुंबई प्रतिनिधी

  मुंबई – राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात समाजातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती वकील , इंजिनिअर, प्राध्यापक, डॉक्टर, साहित्यिक , शाहिर, कवी, गायक, व्यापारी, कलाकार, उद्योजक म्हणून सामील होऊन समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न असून पक्षाचा विस्तार सर्वदूर होण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यातीलच एक नवा आयाम या पक्षाने घातला असून त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून उदयोजक श्रीकांत नायक यांची या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सचिवपदी वर्णी लागल्याची अधिकृत घोषणा या पक्षाचे राष्ट्रीय नेते अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार संघात केली .

उद्योजक श्रीकांत नायक या पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत . त्यांच्या कामाचा व्होरा ओळखून त्यांना या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सचिवपदी नियुक्ती देण्यात आली .

यावेळेस उद्योजक श्रीकांत नायक यांनी सांगितले की , राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ,सन्माननीय नेते अण्णासाहेब कटारे यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे तो आपण आपल्या कामातून सार्थ ठरवणार आहे . आणि येथील वंचित, दुर्बल, आर्थिक मागास आदी सर्व घटकातील तरुण तरुणीसाठी , युवकांसाठी रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल . त्यांना शिक्षण कसे देता येईल यावर आपला भर असल्याचे सांगितले

यावेळेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की , जेथे आमच्या पक्षाचा प्रभाव आहे त्या त्या जागी उमेदवार उभा करून जासतीत जास्त उमेदवार निवडून आणणार आहोत . मुंबईच्या कुर्ला , घाटकोपर येथे उमेदवार उभा करून औरंगाबाद , नागपूर , पुणे , नाशिक , मराठवाडा , मोहोळ , याठिकाणी उमेदवार उभे करणार आहे .

संबंधित पोस्ट

होमगार्डची 27 ऑगस्टपासून मैदानी चाचणी

पुणे येथील‘खडकवासला जलाशय रक्षण’अभियान 23 व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी !निसर्गाचा ऱ्हास न होता त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – भीमराव अण्णा तापकीर, भाजप आमदार, खडकवासला मतदारसंघ

लीलावती हॉस्पिटल ने जारी केले हेल्थ बुलेटीन बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर: दोन सर्जरी झाल्या, डाव्या हातावर…

vishwatmaklokswamivarta

भाजप धारावी विधानसभा जनसेवा कार्यालय 90 फूट रोड येथे रमेश नाडार जिल्हा सचिव यांच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम मध्ये 500 नोट बूक वाटप..

vishwatmaklokswamivarta

रस्त्यावरील खडयामुळे अपघाताने मृत्यु झाल्यास आता कुटुंबाला 6लाख रुपये मिळणार-प्रा.डॉ.जयपाल पाटील

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील कांदिवली येथे राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव…

vishwatmaklokswamivarta