
राष्ट्रीय मराठा पार्टी सत्ताधीशासह विरोधकांना धडा शिकविणार…
( सुरेश गायकवाड )- विशेष प्रतिनिधी
मुंबई- मराठा समाजाच्या प्रश्नांना मूठमाती देण्याऐवजी राज्यकर्त्यांनी आतापर्यंत त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे त्यांनी पुढील लढाई ही सत्तेत येऊन करू असे सांगत मराठा समाजाची फसगत करू पाहणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधीशांसह विरोधकांना धडा शिकविणार असा निर्धार मराठा ठोक क्रांतीचे नेते आबासाहेब पाटील यांनी मुंबईत दिला .
यावेळेस मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीत मराठा ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय मराठा पार्टी पक्षात प्रवेश केला .त्यावेळी राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अकुंशराव पाटील ॲड एचडी पाटील , ॲङ अंकुशराव गवळे , डॉ प्रेमानंद वाघमारे, भाग्यश्री शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळेस पाटील बोलताना पुढे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर केवळ चर्चा आणि बैठका घेतल्या गेल्यात .कोणीही ठोस पावले उचललेली नाहीत.ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. आपण मराठा समाजाच्या हितासाठी हा प्रवेश करीत असून पक्षाच्या भूमिकेशी कायम ठाम राहू .



