vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला; उपमुख्यमंत्र्यांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार-भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला; उपमुख्यमंत्र्यांची ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

मुंबई प्रतिनिधी

: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्प साकारली. त्यांचे प्रत्येक शिल्प अप्रतिम सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचवले. गेल्याच महिन्यात त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आला होता. अभिजात भाषा दिनानिमित्त त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला होता.

राम सुतार यांनी महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येऊन दिल्लीत आपले अढळ स्थान निर्माण केले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काम केले. यातून त्यांची कामाप्रती निष्ठा दिसून येते. एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यावरही ते प्रत्येकाशी आत्मीयता, आपुलकीने बोलत. साधेपणा आणि नम्रपणा हा त्यांचा स्थायीभाव होता. देशभरातील अनेक मूर्तिकारांना घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. दगडातून जिवंत भावना साकारणारा जादूगार आज शांत झाला असला तरी त्यांनी घडवलेली शिल्पे युगानुयुगे त्यांची आठवण करून देत राहतील. राम सुतार यांच्या निधनाने भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा उत्तुंग प्रतिभेचा शिल्पकार आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री पवार यांनी राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एमपीएससीत,मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार

महाराष्ट्र राज्यातील परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरक्षेचा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पथकाकडून आढावा!

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता-राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न

साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी रुपये – मराठी भाषा मंत्री उदय सामंत मराठी भाषा समृद्धीसाठी अनुवाद समिती स्थापन; अमराठी भाषकांसाठी मराठी भाषा ॲप विकसित करणार

vishwatmaklokswamivarta

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा व सीना नदीला सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर,सोलापूरच्या मदतीसाठी ५ यांत्रिक बोटी रवाना….

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती भवनाच्या कॉरिडॉरमध्ये ब्रिटिश व्हाइसरॉयच्या तैलचित्रांच्या जागी आता परमवीर चक्र विजेत्या शूरवीरांची तैलचित्रे..

vishwatmaklokswamivarta