vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करावा; नाराजगी सोडून उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत – गौतम सोनावणे….

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार करावा; नाराजगी सोडून उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत – गौतम सोनावणे….

 

मुंबई प्रतिनिधी – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूकीत भाजप महायुतीला विजयी करायचे आहे.त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जागावाटप मधील नाराजी बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायचा आहे.तसेच राज्यभरात ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत;त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत .रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुतीला विजयी करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले आहे.

भाजप रिपब्लिकन पक्ष शिवसेना राष्ट्रवादी महायुती राज्यात विधानसभा निवडणूक एकजुटीने लढत आहे.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्य मंत्री ना.रामदास आठवले हे महायुती चे नेते आहेत.त्यांनी महायुतीला विजयी करण्यासाठी केलेले आवाहन यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांनी तात्काळ उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीला पाठिंबा द्यावा. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी नाराजगी बाजूला सारून एकजुटीने महायुतीचा प्रचार करावा. जागावाटपामध्ये रिपब्लिकन पक्षावर अन्याय झाला असून त्यामुळे नाराजगी पसरली आहे हे खरे असले तरी भाजप नेतृत्वाने महायुती चे सरकार आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला राज्यात सत्तेत सहभाग देण्याचे ठोस आश्वासन दिले असल्याने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पक्षाची पुढील वाटचाल लक्षात घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने ना.रामदास आठवलेंनी दिलेल्या आदेशाचे पालन करून राज्यात महायुती च्या उमेदवारांचा एकजुटीने प्रचार करावा.ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यांनी तात्काळ उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत असे ना. रामदास आठवले यांचे आदेश असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार तामिळ सेल्वन यांनी केली आहे

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर ! अतिवृष्टीबाधीत भागांची केली पाहणी आपत्तीग्रस्त भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करा गावकऱ्यांनी पंचनामे पूर्ण करुन घ्यावे  पंचनाम्याचे चावडी वाचन करा

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’, संजय राऊत यांची राज्यपालांकडे मागणी

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभाग…

vishwatmaklokswamivarta

देशात महागाईचा डंका : बापरे…पेट्रोलपाठोपाठ आता डिझेल शंभरीपार

शाहरूखच्या मन्नतला आर्यनची प्रतिक्षा:आज तुरुंगातून बाहेर येऊ शकतो आर्यन; वकील मुकुल रोहतगी 

vishwatmaklokswamivarta