vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई न केल्यास कॅनडा सरकारला जागे करण्यासाठी त्यांच्या दूतावासासमोर निदर्शने करू

कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई न केल्यास कॅनडा सरकारला जागे करण्यासाठी त्यांच्या दूतावासासमोर निदर्शने करू ..

राज्य प्रतिनिधी

 कालच कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागातील हिंदू मंदिरावर ‘सीख फॉर जस्टीस’ या संघटनेने आणि खलिस्तानवादी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हल्ला केला; मात्र या हिंसक हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच पाठिशी घालण्याचा प्रकार कॅनडा सरकारने केला आहे. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. यापूर्वीही कॅनेडामध्ये मंदिरांवर हल्ले झाले आहेत. कॅनडा सरकारने हे सर्व हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करून सर्व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा कॅनड सरकारला जागे करण्यासाठी भारतातील त्यांच्या दूतावासासमोर हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिली आहे.

 

भारतीय उच्चायुक्त हे कॅनडातील मंदिराच्या भेटीसाठी जाणार हे माहिती असतांनाही त्यांच्या आणि मंदिर यांच्या सुरक्षेसाठी वा सदर हल्ला होऊच नये म्हणून कॅनडा सरकार काहीही ठोस कृती केलेली नाही. त्यामुळे या हल्ल्याला कॅनडा सरकारची मुकसंमती होती का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडामध्ये हिंदूंवरील, तसेच मंदिरांवरील हल्ले रोखण्यात कॅनडा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे भारत सरकारने हे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून कॅनडा सरकारवर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे, अशी आमची भारत सरकारकडे मागणी आहे. हल्लेखोर संघटनेचे भारतात जे कोणी पाठिराखे असतील, त्यांच्यावर भारत सरकारने कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

*श्री. रमेश शिंदे,* राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या सर्वंकष प्रगतीत सर्व क्षेत्रांचे योगदान गरजेचे-राज्यपाल रमेश बैस.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र  राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं, या तारखेला निवडणूका जाहीर

vishwatmaklokswamivarta

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

ओझर (जिल्हा पुणे) येथील द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’‘काशी-मथुरा मुक्त व्हावी’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

vishwatmaklokswamivarta

महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे-फिश मार्केटच्या वास्तूचे भूमिपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

प्रशासकीय कामकाजातून मराठी भाषा-संवर्धनाचे काम करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta