vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र  राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं, या तारखेला निवडणूका जाहीर

महाराष्ट्र  राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलं, या तारखेला निवडणूका जाहीर

[महाराष्ट्र प्रतिनिधी

राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलंय. राज्यातील 17 जिल्ह्यात 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला.

 

92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार असून 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत.

 

छाननी आणि वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी 29 जुलै रोजी जाहिर केली होणार असून 4 ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. उमेदवारांना प्रचारासाठी 14 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

 

कोणत्या 17 जिल्ह्यात निवडणूका?

ज्या 17 जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत त्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलडाणा यांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला रस्ते विकास, पाणी पुरवठा योजनेचा आढावाअतिक्रमण हटाव मुळे बेघर झालेल्या परिवारांना मोफत घरे देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मुंबई आयुक्त इक्बालसिंह चहल यांना इन्कम टॅक्सची नोटीस….

महाराष्ट्रात पुन्हा कोरोना निर्बंध लागणार? अजित पवारांचं मोठं विधान

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सक्षम – मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

11वा आंतरराष्ट्रीय योग दिन दि.21 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार साजरा

vishwatmaklokswamivarta

मुंबई, वडाळा रेल्वे मोनोरेल खाली ब्रिज जवळ तीन अल्पवयीन मुले सापडली. परिवाराचा शोध मुंबई पोलीस.