vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

11वा आंतरराष्ट्रीय योग दिन दि.21 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार साजरा

11वा आंतरराष्ट्रीय योग दिन दि.21 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार साजरा

ठाणे प्रतिनिधी

संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून घोषित केलेला आहे. 5 हजार वर्षांहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारिरीक व आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यीभूत आहे. त्यानुसार प्रतिवर्षी 21 जून हा दिवस संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबतची सविस्तर माहिती www.ayush.gov.in केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालायाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून जिल्ह्यामध्ये शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कार्यालये, औद्योगिक प्रतिष्ठाने, क्रीडा व युवक कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा, असे निर्देश प्राप्त झाले आहेत.

ठाणे जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन पतंजली योग समिती, प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, ठाणे जिल्हा योग असोसिएशन यांच्या सहकार्याने तालुका क्रीडा संकुल, कोपरी बारा बंगला ऑफिसर्स क्लब शेजारी, ठाणे (पूर्व) येथे सकाळी ठीक 7.30 वाजता करण्यात येत असून या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्र.उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर यांनी केले आहे.

अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के – ९६६४३५७११९, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव- ८३५६०८४७६९, क्रीडा अधिकारी सिध्दार्थ वाघमारे- ९८७०८९८६८० यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री.चौधर यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात MY Bharat पोर्टल नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’मधील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालकमंत्री आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जावर गतीने निपटारा करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

नवी मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरू,मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटीस बजावून जप्तीची कारवाई करा – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे व अवकाळी पावसाची शक्यता; मच्छिमारांना सतर्कतेचं आवाहन.

vishwatmaklokswamivarta