vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विधानसभा निवडणूक २०२४-१०८-औरंगाबाद(पश्चिम);चार मतदान केंद्रांचेठिकाण तर पाच मतदान केंद्रांच्या नावात बदल…

विधानसभा निवडणूक २०२४-१०८-औरंगाबाद(पश्चिम);चार मतदान केंद्रांचेठिकाण तर पाच मतदान केंद्रांच्या नावात बदल…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १०८ औरंगाबाद(पश्चिम) विधानसभा मतदार संघातील चार मतदान केंद्रांचे ठिकाण व पाच मतदान केंद्रांचे नावात बदल करण्यात आला असून या बदलास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी कळविले आहे.

ठिकाणात बदल झालेले मतदान केंद्र

१. मतदान केंद्र क्रमांक १७८ पुर्वीचे केंद्र प्रगती विद्यालय पडेगाव खो.क्र.१ पूर्व बाजू ऐवजी आता इंडो माईंडस प्रेस्कूल पडेगाव खोली क्रमांक १ मध्ये असेल.

. मतदान केंद्र क्रमांक १७९ पुर्वीचे प्रगती विद्यालय पडेगाव खो.क्र.२ पूर्व बाजू ऐवजी आता इंडो माईंडस प्रेस्कूल पडेगाव खोली क्रमांक २ मध्ये असेल.

३. मतदान केंद्र क्रमांक २४१ पुर्वीचे तलत उर्दू माध्यम प्रा. शा. शहानूर वाडी खोली क्रमांक १ पूर्व बाजू ऐवजी आता इंडोब्रेन्स प्रेस्कूल , प्रतापनगर खोली क्रमांक १ मध्ये असेल.

४. मतदान केद्र क्रमांक २४२ पुर्वीचे तलत उर्दू माध्यम प्रा. शा. शहानूर वाडी खोली क्रमांक २ पुर्व बाजू ऐवजी आता इंडोब्रेन्स प्रेस्कूल प्रतापनजगर ,खोली क्रमांक २ मध्ये असेल.

नावात बदल झालेले मतदान केंद्र

१. मतदान केंद्र क्रमांक १७ पुर्वीचे नाव सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्स खो.क्र.१ पूर्व बाजू ऐवजी आता माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज, वाळुज महानगर-१, खोली क्रमांक १ असे असेल.

२. मतदान केंद्र क्रमांक १८ पुर्वीचे नाव सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्स खो.क्र.२ पूर्व बाजू ऐवजी आता माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज, वाळुज महानगर-१, खोली क्रमांक २ असे असेल.३. मतदान केंद्र क्रमांक १९ पुर्वीचे नाव सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्स खो.क्र.३ पश्चिम बाजू ऐवजी आता माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज, वाळुज महानगर-१, खोली क्रमांक ३ असे असेल.

४. मतदान केंद्र क्रमांक २० पुर्वीचे नाव सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्स खो.क्र.४ पूर्व बाजू ऐवजी आता माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज, वाळुज महानगर-१, खोली क्रमांक ४ असे असेल.५. मतदान केंद्र क्रमांक २१ पुर्वीचे नाव सह्याद्री टेक्निकल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्स खो.क्र.५ पश्चिम बाजू ऐवजी आता माता रमाबाई आंबेडकर महिला विधी कॉलेज, वाळुज महानगर-१, खोली क्रमांक ५ असे असेल.

असे १०८- औरंगाबाद पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी कळविले असून अधिक माहितीसाठी त्यांचे कार्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वेस्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

नागपुरात भाजपा विजय, 153 जागेवर वर्चस्व प्रस्थापित…

vishwatmaklokswamivarta

परिवहन संवर्गातील वाहनांकरिता 23 जूनपासून नवीन मालिका..

अमरावती जिल्ह्यासाठी ‘आधारभूत’ खरेदी केंद्रांना मंजुरी;शेतकऱ्यांना तातडीने नोंदणीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आता महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल्समध्ये मोफत होणार सर्व उपचार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

बीड जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण जाहीर, पाहा कोणते गट ओबीसी, एसी, एसटी राखीव