vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वीप कार्यक्रमांतर्गत नमुंमपा मुख्यालयात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासमवेत सामुहिक मतदार प्रतिज्ञा ग्रहण

स्वीप कार्यक्रमांतर्गत नमुंमपा मुख्यालयात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासमवेत सामुहिक मतदार प्रतिज्ञा ग्रहण

 

     नवी मुंबई प्रतिनिधी -आपण आपल्या अधिकारांबाबत जितके जागरूक असतो तितकेच आपल्या कर्तव्याबाबतही जागरूक असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी 20 नोव्हेंबर रोजी प्रत्येकाने लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे तसेच आपल्या नातेवाईक, परिचितांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे सांगितले.

  राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत 8 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत मतदार जागरूकतेविषयी विविध उपक्रम राबविण्याचे वेळापत्रक प्राप्त झाले असून त्या अंतर्गत महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यासमवेत उपस्थित विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी मतदार प्रतिज्ञा सामुहिकरित्या ग्रहण केली. केवळ तोंडी प्रतिज्ञा न घेता तिचे पालन करावे व इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

 याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.अमोल शिंदे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक श्री. जितेंद्र इंगळे, उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे व श्री. संतोष वारूळे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

  यावेळी बोलताना जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत नियुक्त नवी मुंबईतील 150 ऐरोली व 151 बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी निवडणूक कार्यालयांप्रमाणेच आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वीप अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या व नियोजित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून पोस्टर्स, होर्डींग, बॅनर्स, कलावंतांचे मतदान करावे असे आवाहन करणा-या व्हिडिओ चित्रफिती, सोशल मिडिया पोस्ट यापुढे जात थेट मतदारांपर्यंत पोहचून व त्यातही मागील वेळी कमी मतदान झाले आहे अशा भागांवर लक्ष केंद्रीत करून तेथील मतदारांना मतदान करण्याविषयी आवाहन करण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याकामी महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनीही आपण राहतो त्या सोसायटी, वसाहतींमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना त्यांनी केल्या.

 यावेळी निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेल्या मतदान गीताचे प्रसारण करण्यात आले. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात स्वीप कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपआयुक्त दर्जाच्या अतिरिक्त स्वीप नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार मतदार जागरूकता उपक्रम राबवून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत थेट पोहचण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  महापालिका मुख्यालयाप्रमाणेच विधानसभा निवडणूक कार्यालयांमार्फतही दोन्ही मतदारसंघात विविध ठिकाणी सामुहिक मतदार प्रतिज्ञा घेण्याचे उपक्रम राबविण्यात आले.

संबंधित पोस्ट

गणेश विसर्जन व ईद ए मिलाद सणाच्या निमित्ताने परि.६ मध्ये पोलीस संचलन 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचा धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा, तब्बल 19 मोठे निर्णय; शेवटच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धूम धडाका

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तर युवा महोत्सवातील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरितायुवक-युवतींनी तसेच युवा मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी सक्षमीकरण कार्यालय सुरू

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्रपुरस्कारासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे- प्र. संचालक अशोक गाडेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta