vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

क्यूआर कोड प्रणालीच्या माध्यमातून-मतदारांना ‍मिळणार मतदानकेंद्राची माहिती-जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

क्यूआर कोड प्रणालीच्या माध्यमातून-मतदारांना ‍मिळणार मतदानकेंद्राची माहिती-जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

 

ठाणे,‍ प्रतिनिधी- येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी नागरिकांना मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणे सोईचे व्हावे ‍किंबहुना आपले मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून मिळणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या माध्यमातून “Locate your Polling Station” ही “बारकोड प्रणाली” तयार करण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदान केंद्रावर पोहोचणे सहज शक्य व्हावे, यासाठी Locate your Polling Station ही बारकोड प्रणाली तयार करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे ‍जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी असलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यास त्यावर ठाण्यातील सर्व मतदान केंद्र दिसतील. त्यानंतर मतदारांनी मतदार स्लिपवरील मतदान केंद्र क्रमांक क्लिक केल्यास मतदान केंद्र कुठे आहे, किती अंतरावर आहे, तसेच मतदान केंद्राकडे कसे जायचे याचा गुगल मॅप उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सहजरित्या पोहचता येणार आहे.

मतदाराला मतदान केंद्रापर्यंत जाणे सहज सोपे व्हावे व हे क्यूआर कोड मतदारांपर्यंत पोहचावे, यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाकडून फेसबुक, इन्स्टाग्रॅम, एक्स (ट्विटर), युट्यूब तसेच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे

संबंधित पोस्ट

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून दौरा सुरू*विविध विभागांचा घेतला आढावा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :आपलं मत….आपली ताकद …स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती

vishwatmaklokswamivarta

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

सांघिक आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

ठाणे विधानसभा मतदारसंघातील-महिला रिक्षाचालक करत आहेत मतदान जनजागृती

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024विधानसभा मतदारसंघासाठी मतदान यंत्राची पहिली पुरवणी सरमिसळ

vishwatmaklokswamivarta