vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जखमी शेर मैदान मे-10 लोकसभा, 15 विधानसभा मतदार संघ लढविणारे बाबासाहेब पाटील शिंदे

जखमी शेर मैदान मे-10 लोकसभा, 15 विधानसभा मतदार संघ लढविणारे बाबासाहेब पाटील शिंदे

 

जालना (प्रतिनिधी) : घनसावंगी विधानसभा मतदार संघातून शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार आणि सामान्य नागरीकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी निवडणूक रिंगणात पुन्हा एकदा जखमी शेर बाबासाहेब पाटील शिंदे रा. बापकळ ता. जि. जालना हे मैदानात उतरला असून यापुव दहा लोकसभा आणि 14 विधानसभा निवडणूका लढविल्या आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविण्याचे श्री शिंदे यांचे ठोस पाऊल म्हणजे शेतकरी, कष्टकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगार तरूण यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आपण या सर्व निवडणूका लढविल्या आहेत. मात्र, जय-पराजय हा होतच असतो आणि पराजय झाला त्यामुळे खचून जाण्याचे काहीच कारण नसल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच आपल्या जाहिरानाम्यात त्यांनी उल्लेख केला आहे की, सुशिक्षितांना योग्य नोकऱ्या किंवा योग्य मानधन तसेच पोलीस पाटील, कोतवाल, होमगार्ड, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, मजुर, शेतकरी, गाव तंटामुक्ती कार्यकर्ते, अंगणवाडी कार्यकर्त्या, बचत गट आदींना 15 ते 20 हजार रूपयांचे मानधन मिळावे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा. तसेच शेती मालाला निर्यातबंदी नसावी. शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे, बि-बियाने, खते-औषधी, विज, पाणी ईत्यादी स्वस्त दरामध्ये उपलब्ध व्हावे. सरकारी (आथक) सहकार्याने चालणाऱ्या खाजगी व सरकारी प्रकल्पामध्ये भूमिपुत्रांना आरक्षण व भागीदारी मिळावी. स्त्रीयांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये 50 टक्के आरक्षण देण्यात यावे या सह अनेक प्रश्नांची गाठ आपल्या मनाशी बांधून बाबासाहेब पाटील शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडीलयोजनेच्या लाभासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे लाभ घेण्याचे आवाहन

माणगांव शहरातील नागरी समस्यांचे मान्सूनपूर्व निराकरण करा – मंत्री आदिती तटकरे

कोल्हापुरातील घटना जळालेल्या कारमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ, हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील घटना…

वसमत नगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण हटवणार- उद्योग मंत्री उदय सामंत