vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे लाभ घेण्याचे आवाहन

शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे लाभ घेण्याचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी- इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्यातील महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विदयार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत विदयार्थ्यांना दरमहा भोजन, प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्य, आरोग्य इ. करीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो. या योजनेचा लाभ घेणेकरीता बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) शिक्षण घेणारे व ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये २.५० लाख पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिमाह भोजन भत्ता रुपये ४,५००/-, निर्वाह भत्ता प्रतिमाह रुपये ६००/-, मुलींकरीता स्वच्छता भत्ता प्रतिमाह रुपये २००/-, नाईट ड्रेस, महाविदयालयीन गणवेश, शैक्षणिक सहल, प्रोजेक्ट रिपोर्ट याकरीता प्रतिवर्ष भत्ता वाटप केला जातो.

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इयत्ता १२ वी नंतरचे बिगर व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना दि. २७ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर https://hmas.mahait.org प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांचे कार्यालयात जमा करावयाची आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावेत असे अवाहन डॉ. कांचन जगताप, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सातारा यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

सेल्को फाउंडेशन’च्या सहकार्याने १८ जिल्ह्यांत,प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरणसौर ऊर्जेच्या वापरामुळे दर्जेदार आरोग्य सुविधांची उपलब्धता- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वटसावित्री पौर्णिमा निमित्त पैठण रोड विटखेडा वार्डात 1001 वडाच्या रोपांचे वाटप. सौभाग्याचे प्रतीक असलेल्या पवित्र अशा वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्त..

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

शेतकरी केंद्रस्थानी ठेऊन शेतमाल मूल्यसाखळीचे बळकटीकरण करावे – पणन मंत्री जयकुमार रावल “मॅग्नेट“ची १८ व्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक

जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी-वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta