vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जखमी शेर मैदान मे-10 लोकसभा, 15 विधानसभा मतदार संघ लढविणारे बाबासाहेब पाटील शिंदे

जखमी शेर मैदान मे-10 लोकसभा, 15 विधानसभा मतदार संघ लढविणारे बाबासाहेब पाटील शिंदे

 

जालना (प्रतिनिधी) : घनसावंगी विधानसभा मतदार संघातून शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार आणि सामान्य नागरीकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी निवडणूक रिंगणात पुन्हा एकदा जखमी शेर बाबासाहेब पाटील शिंदे रा. बापकळ ता. जि. जालना हे मैदानात उतरला असून यापुव दहा लोकसभा आणि 14 विधानसभा निवडणूका लढविल्या आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविण्याचे श्री शिंदे यांचे ठोस पाऊल म्हणजे शेतकरी, कष्टकरी, कामगार, सुशिक्षित बेरोजगार तरूण यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून आपण या सर्व निवडणूका लढविल्या आहेत. मात्र, जय-पराजय हा होतच असतो आणि पराजय झाला त्यामुळे खचून जाण्याचे काहीच कारण नसल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच आपल्या जाहिरानाम्यात त्यांनी उल्लेख केला आहे की, सुशिक्षितांना योग्य नोकऱ्या किंवा योग्य मानधन तसेच पोलीस पाटील, कोतवाल, होमगार्ड, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, मजुर, शेतकरी, गाव तंटामुक्ती कार्यकर्ते, अंगणवाडी कार्यकर्त्या, बचत गट आदींना 15 ते 20 हजार रूपयांचे मानधन मिळावे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा. तसेच शेती मालाला निर्यातबंदी नसावी. शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावे, बि-बियाने, खते-औषधी, विज, पाणी ईत्यादी स्वस्त दरामध्ये उपलब्ध व्हावे. सरकारी (आथक) सहकार्याने चालणाऱ्या खाजगी व सरकारी प्रकल्पामध्ये भूमिपुत्रांना आरक्षण व भागीदारी मिळावी. स्त्रीयांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये 50 टक्के आरक्षण देण्यात यावे या सह अनेक प्रश्नांची गाठ आपल्या मनाशी बांधून बाबासाहेब पाटील शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

संबंधित पोस्ट

मतमोजणी प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक-2025 जालना जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गटांसाठी आरक्षण निश्चित· जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत संपन्न

vishwatmaklokswamivarta

शिवसेना आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद..

राजस्थान उदयपूर येथील सभेत ,4 वर्षांत एकदाही राहुल गांधींना भेटू शकलो नाही, उदयपूरच्या शिबिरात आत्मपरीक्षण झाले नाही’- माजी खासदार पृथ्वीराज चव्हाण यांची नाराजी

उद्योजकांसाठी अलिबाग येथे बुधवारी कार्यशाळा,उद्योग संचालनालयामार्फत एमएसएमई विकासाकरिता आयोजन

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद विभाग पदवीधर विधानपरिषद मतदार संघांच्या नव्याने तयार करण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या संदर्भात महत्वाचा खुलासा…

vishwatmaklokswamivarta