vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

औरंगाबाद विभाग पदवीधर विधानपरिषद मतदार संघांच्या नव्याने तयार करण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या संदर्भात महत्वाचा खुलासा…

औरंगाबाद विभाग पदवीधर विधानपरिषद मतदार संघांच्या नव्याने तयार करण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या संदर्भात महत्वाचा खुलासा…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर विधान परिषद मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असुन दि.०६ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या मतदारांची प्रारुप मतदार यादी दि.२५ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच प्रारुप यादीबाबत दावे व हरकती सादर करण्यास संधी देवून त्यावर निर्णय घेवून दि.३० डिसेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

विधानपरिषदेच्या सदर जागा डिसेंबर 2026 मध्ये रिक्त होणार आहेत. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० मधील तरतूदीनुसार मतदार यादयामध्ये संबंधित निवडणूकांकरीता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत सुधारणा, नव्याने समावेशन किंवा वगळणी करता येते. सबब उपरोक्त नमूद पदवीधर विधानपरिषद मतदार संघाच्या मतदार याद्या दि.३० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतरही त्या याद्यामध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने नव्याने नाव समाविष्ट करण्याची संधी पात्र मतदारांना संबंधित निवडणूकांच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत उपलब्ध असणार आहे, असे ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या सहायक मतदार नोंदणी अधिकारी मंजूषा मिसकर यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील३७२ क्रीडापटूंचे शासकीय सेवेत थेट समावेशन,सांगलीत अखिल भारतीय कनॉईंग, कयाकिंग स्पर्धांचे उत्साही उद्घाटन

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी-संगठन मजबूत करावे – भास्कर (आबा) दानवे,जालना शहरातील संग्राम नगर येथे भाजयुमो चे शाखा उदघाटन

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लालबागचा राजाचा 2025 विसर्जन सोहळा थेट प्रक्षेपण पहा “विश्वात्मक लोकस्वामीवार्ता” वेब पोर्टलवर-:-https://vishwatmaklokswamivarta.com/ या घ्या गणपती बाप्पाचे दर्शन गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या….

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्य शासनाचा सकारात्मक प्रयत्न – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानवीय दृष्टीकोनाने अचूक कर्तव्य पार पाडावे- पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- महसूल विभाग शासनाचा कणा व चेहरा असल्याची भावना – महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ..

क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे