vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग, सिलिंडर स्फोटांनी हादरला परिसर स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

मुंबईत ओशिवरा फर्निचर मार्केटला भीषण आग, सिलिंडर स्फोटांनी हादरला परिसर स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात असलेल्या ओशिवारा येथे फर्निचर मार्केट असलेल्या लाकडाच्या गोदामाला अचानक आग लागल्याने जवळपास 25 पेक्षा जास्त दुकाने जळून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे सदर आग लागली असता अग्नीची सूचना मिळाली मोठ्या प्रमाणात अग्निशम दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी हजर झाल्या होत्या त्यांनी आग विझवण्यासाठी मोठ्या शिपातीने प्रयत्न केले होते आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेले आहे

ओशिवराचा एस. व्ही. रोड हा फर्निचर मार्केटसाठी प्रसिद्ध असून, येथे लाकडाची गोदामे आणि विविध शोभेच्या वस्तूंची दुकाने आहेत. सकाळी अचानक आग लागल्याने आगीचा ( वेगाने फैलाव झाला. सिलिंडर स्फोटांमुळे आग अधिक तीव्र झाली,  परिसरातील नागरिक भीतीचे वातावरण होते परंतु

अग्निशमन दलाची तातडीची कारवाई आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. याशिवाय पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम हाती घेतले आहे.

एस. व्ही. रोड हा गोरेगाव-जोगेश्वरीदरम्यान महत्त्वाचा मार्ग असल्याने, या घटनेमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.  आग आणखी भडकत असल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

आग लागण्याचे कारण आणि स्थितीमुंबई अग्निशमन दलाने या आगीला  लेव्हल २ (मोठी आग) म्हणून घोषित केले आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे, परंतु अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. सदरची  संपूर्ण माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे

संबंधित पोस्ट

अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक संपन्न

माहिती अधिकारीपदी संजीवनी जाधव-पाटील रुजू

प्रियदर्शनी कॉलनीत सिमेंट रोड चे भूमिपूजन प्रभागाचा विकास जनतेच्या विश्वासातून – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत आता पुण्यात मेट्रोच्या पर्पल आणि अ‍ॅक्वा लाईन वर सेवा रात्री 11 पर्यंत चालवली जाणार

vishwatmaklokswamivarta

जनगणनेचे काम अचूक पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया