vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-मतमोजणी कालावधीत मतमोजणी परिसरात कलम 163 लागु

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-मतमोजणी कालावधीत मतमोजणी परिसरात कलम 163 लागु

 

        जालना, राज्य प्रतिनिधी: भारत निवडणूक आयोगाद्वारे प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार तात्काळ प्रभावाने आचार संहिता लागु झाली असून जालना जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102-बदनापूर, 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान प्रक्रिया होणार असून दिनांक 23 नोव्हेंबर, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

 त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, त्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासुन 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय/उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व ईतर ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरीक्त खाजगी वाहन व निवडणूक कामाव्यतिरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. जिल्हादंडाधिकारी जालना डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 आदेशाव्दारे खालील कृत्य करण्यास मनाई केली आहे.

मतमोजणी केंद्राचे 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय/उमेदवाराचे मंडप, सर्व दुकाने ई. तसेच, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादींच्या वापरावर बंदी घालत आहे.निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. मतमोजणी केंद्राचे 200 मीटर परिसरात नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना वगळून पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.मतमोजणी केंद्राचे 200 मीटरच्या आत संबंधीत पक्षाचे उमेदवाराच्या चिन्हांचे प्रदर्शन करणेस व निवडणूक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामकाजासाठी नियुक्त असलेल्या अधिकारी/कर्मचारी व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्यक्तींना वैध ओळखपत्र असलयाशिवाय प्रवेश करणेस प्रतिबंध करण्यात येत आहे.

सदर आदेश हे निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्त्त अधिकारी/कर्मचारी यांना लागु राहणार नाहीत.सदर आदेश हे निवडणूकीची कामे हाताळतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन दिनांक 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 5.00 वा. पासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचे जिल्हादंडधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

15 ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण**पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते*

यवतमाळ मधील मागाव ती घटना,स्वतः बनविलेल्या हेलिकॉप्टरला उडवण्याचा प्रयत्न रँचोच्या जीवावर बेतला

जिल्ह्यात विविध क्षेत्रात 1 हजार कोटीहून अधिक गुंतवणक करण्यासाठी उद्योजकांचा शासनाबरोबर सामंजस्‌य करारजिल्ह्यात 3 हजाराहून अधिक होणार रोजगार निर्मिती होणार

सामान्य जनतेसाठी पहिल्यांदाच सुरु होणार ई-पासपोर्टची सुविधा, सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक चिप सहित.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले ठाण्यातील लाडक्या बहिणींच्या घरी,आठवडाभरात एक कोटी घरांपर्यंत पोहोचवण्याचे शिवसेनेचे लक्ष्य,युवा सेनेवर या महत्वकांक्षी जनसंपर्क अभियानाची जबाबदारी

vishwatmaklokswamivarta

जैन समाजभवन व साधुसंतांसाठी निवाऱ्याची आवश्यकता- ललीत गांधी अल्पसंख्याक कल्याण योजनांचा आढावाजैन व्यापाऱ्यांनी उद्योग-व्यवसायात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन..