vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

संभाजीनगर : तोडफोड गाड्याप्रकरणी सखोल करा-अर्जुनराव खोतकर

संभाजीनगर : तोडफोड गाड्याप्रकरणी सखोल करा-अर्जुनराव खोतकर

जालना प्रतिनिधी : येथील शांतीनिकेतन विद्यालय परिसरात राहत असलेल्या सहा ते सात जनांच्या घरासमोर (पार्किंगमध्ये) लावलेल्या गाड्यांची जमावाने तोडफोड केली आहे. ही तोडफोड काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी महायुतीचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांनी केली आहे. हे काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे असल्याचा संशयही श्री. खोतकर यांनी व्यक्त केला आहे

यांसंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतदानच्या दिवशी म्हणजे दि. 20 नोव्हेंबर 2024 मतदान होण्याच्या एक दिवस अगोदर मंगळवारी रात्री 12 ते सकाळी 4 वाजेच्या दरम्यान संभाजीनगर येथे शांतीनिकेतन विदयालय परिसरामध्ये मतदान केंद्र आहे. तेथे रोडवर म्हणजे आपल्या घरासमोर पार्किंग केलेल्या सहा ते सात चारचाकी गाड्यांची खोडसाळपणाने अज्ञाताने लाठ्या काठ्याने तोडफोड केली व निवडणुकीच्या वेळी मतदानाच्या दिवशी वातावरण दुषित करण्याचा खोडसाळपणाने प्रयत्न केला आहे. सदरील अज्ञात व्यक्ती हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा असल्याचा अंदाज मतदानाच्या दिवशी नागरीकांकडुन व्यक्त केला जात होता. जालना शहरातील वाढती गुन्हेगारी, गुंडागिरी, घरफोडी यावर बाळा घालावा. तरी या घटनेची सखोल चौकशी करुन असे कृत्य करणान्यावर कायदेशीर कार्यवाही करुन सदरील गाडयांची झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई सबंधीतांकडुन वसुल करुन देण्यात यावी, अशी विनंतीही या निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.यावेळी भाऊसाहेब घुगे, अभिमन्यु खोतकर, विष्णू पाचफुले आदींची

फोटो क्र. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी भराडखेडा या मूळ गावी कुटुंबीयांसमवेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या समवेत कल्पना घुगे, स्मिता घुगे, रूपंमं घुगे, कृष्णा घुगे , रमेश घुगे, किशोर घुगे, शारदा घुगे, संतोष घुगे, कैलास पालवे, राम दराड,े ज्ञानेश्वर दराडे यांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

मातीचा गंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून विभागाचा आढावा-पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार,पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार- पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

पोलीस मुख्यालयात अवयव दान जनजागृती अभियान संपन्न

मदरशामधील तकरीच्या स्पर्धेत प्रथम आल्याने अलिना मुसा खान सन्मानित

vishwatmaklokswamivarta

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

परीक्षा केंद्राच्या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू