vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

 

       जालना, प्रतिनिधी: जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेत कार्यरत असलेले तहसीलदार रंगनाथ मेंडके हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात एका विशेष निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी तहसीलदार श्री.मेंडके यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  तहसीलदार रंगनाथ मेंडके यांनी आपल्या कार्यकाळात महसूल विभागात अत्यंत सचोटीने आणि कार्यक्षमतेने काम केले. प्रशासनातील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले, अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला

     याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, सहायक जिल्हाधिकारी बी. सर्वनन यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_*_*_*_*_

संबंधित पोस्ट

09 डिसेंबर रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

vishwatmaklokswamivarta

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

गणेशोत्सव: राज्य महा उत्सव अंतर्गत स्पर्धा व पोर्टलला उदंड प्रतिसाद  सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांचे अधिक सहभागाचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम मोहीमे मध्ये जालना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यामध्ये द्वितीय

स्वच्छ जालना, सुंदर जालना! 🧹✨

बुलढाणा १९ एप्रिल रोजी भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा