vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

चितेगावातून जाणाऱ्या वाहतुक मार्गात बदल

चितेगावातून जाणाऱ्या वाहतुक मार्गात बदल

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्यालगत सुरु आहे. हे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत ह्याच मार्गावरील चितेगाव येथे काम सुरु करावयाचे असून रहदारीमुळे या कामात व कामामुळे रहदारीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चितेगाव येथून जाणारी जड व हलक्या वाहनांची वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले आहेत. हे बदल दि.१० डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या कामाच्या अनुषंगाने करण्यात आले असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बदल करण्यात आलेला जड वाहनांचा मार्ग-छत्रपती संभाजीनगर ते पैठणकडे जाणारी वाहने – छत्रपती संभाजीनगर- वाळूज- ईमामपुरवाडी- रांजणगाव- शेक्टामार्गे बिडकीन व पुढे पैठणकडे जातील.पैठण ते छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहने पैठण- बिडकीन-शेक्टा- रांजणगाव-ईमामपुरवाडी-वाळूज मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील,तसेचछत्रपती संभाजीनगर कडून पैठणकडे जाणारी वाहने- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२-कचनेर कमान- कचनेर- पोरगाव चौफुली- निजलगाव- बिडकीन-मार्गे पैठणकडे जातील

पैठण ते छत्रपती संभाजीनगर कडे येणारी वाहने- पैठण- बिडकीन- निलजगाव- पोरगाव चौफुली- कचनेर-कचनेर कमान- राष्त्रीय महामार्ग क्रमांक ५२ मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.हलक्या वाहनांसाठी-छत्रपती संभाजीनगर ते पैठणकडे जाणारी हलकी वाहने- छत्रपती संभाजीनगर- गेवराई तांडा- गिरनेरा तांडा-बोकुडजळगाव- निलज्गाव मार्गे बिडकीन व पुढे पैठणकडे जातील.पैठण ते छत्रपती संभाजीनगरकडे येणारी हलकी वाहने- पैठण- बिड्कीन- निलजगाव- बोकुडजळगाव- गिरनेर तांडा-गेवराई तांडा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.

०००००

संबंधित पोस्ट

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक अर्जुनराव खोतकर व संचालकांनी शासनाने केलेल्या नियुक्तीपासून आजपर्यंत किती बैठक भत्ता व इतर भत्ते तसेच मानधन उचलले याबाबतची माहिती देण्यास बाजार समितीच्या  टाळाटाळ..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे 5 हजार 674 प्रकरणे निकाली; 51 कोटी 80 लक्ष रूपयांची तडजोड शुल्क वसूल…

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांकडून विकासकामांची पाहणी

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2023 :मतदान केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज मागणी..

प्रतापगड  अफजलखान कबरीच्या सभोवतालच्या परिसरात पोलीस दलाकडून प्रतिबंध आदेश जारी

vishwatmaklokswamivarta