vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लाडक्या बहिणींना डिसेंबर माहिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

लाडक्या बहिणींना डिसेंबर माहिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

 

 राज्य प्रतिनिधी -मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विधिमंडळात महत्त्वाची अपडेट अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

 विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  च्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. फडणवीसांनी महायुती सरकार कडून कोणतीही योजना बंद केली जाणार नाही याची ग्वाही दिली आहे. सोबतच राज्यातल्या महिला डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्याचंही उत्तर दिलं आहे. दरम्यान फडणवीसांनी आज विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना डिसेंबर माहिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना चे निकष बदलणार का?

मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना मध्ये निकष बदलणार का? असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी चूकीच्या पद्धतीने कोणी पैसे घेत असल्यास त्यावर कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मुलीच्या नावे पैसे घेणारे पुरूष, एकापेक्षा अधिक अकाऊंट्स द्वारे पैसे घेणारे लाभार्थी यावर सहाजिकच कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 1500 रूपये दरमहा मिळत होते. वचननाम्यामध्ये ही रक्कम 2100 केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता नव्या रक्कमेचा हफ्ता कधी मिळणार याची देखील महिलांना उत्सुकता आहे. दरम्यान आर्थिक तरतूद करूनच हफ्ता वाढवला जाऊ शकतो त्यामुळे 2100 साठी अजून काही महिने महिलांना वाट पहावी लागेल असा अंदाज आहे.00000

संबंधित पोस्ट

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे प्रशिक्षणासाठी आवाहन 

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन उद्योजकांनी दंड व्याजाची रक्कम माफ करुन घेवून कर्जाची परतफेड करावी

जातीनिहाय आरक्षणाला राज ठाकरे यांचा विरोध, राष्ट्रवादीमुळेच जातीयवाद वाढल्याचा पुनरुच्चार

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासहनाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट,कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

विशेष – लेख मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार (भाग-2)

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे गोवा वरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबई मध्ये आल्यानंतर राज्यपाल यांची भेट घेणार