vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे गुण प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे गुण प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

राज्य प्रतिनिधी-नांदेड  :- फेब्रुवारी-मार्च 2026 च्या दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव ऑनलाईन बुधवार 15 एप्रिल 2026 पर्यंत सादर करण्याचे आवाहन लातूर विभागीय मंडळाने केले आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना व एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात येतात. यासाठीचा शासन निर्णय दिनांक 20 डिसेंबर 2018 रोजी निर्गमीत करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

या शासन निर्णयानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून क्रीडा प्रस्ताव तसेच एन.सी.सी. स्काऊट गाईड इत्यादी प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडून दरवर्षी विभागीय मंडळाकडे सादर केले जातात. त्याअनुषंगाने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इ.१० वी व इ. १२ परीक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे आपले सरकार पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने पाठवावयाचे आहेत. तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईडचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विभागीय मंडळांकडे प्रचलित पध्दतीने दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत पाठवावयाचे आहेत.

सर्व जिल्हा कीडा अधिकारी, सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक व सर्व संबंधित घटकांनी या बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असेही आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य; गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजनेस मान्यता देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील सुमारे ७ किलोमीटर नाल्याचे आणि तांबरवाडी, राजेवाडी येथील सुमारे ६ किलोमीटर नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची प्रत्यक्ष पहाणी

जिल्ह्यातील शोध व बचाव पथकांचे काटेपूर्णा प्रकल्प येथे प्रशिक्षण राज्य पथकाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन..

पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन

महाविस्तार अपचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta