vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सुशासन सप्ताहात ५३०१ लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ-९१ शिबीरांचे आयोजन ; ५८९ तक्रार अर्ज निकाली…

सुशासन सप्ताहात ५३०१ लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ-९१ शिबीरांचे आयोजन ; ५८९ तक्रार अर्ज निकाली…

 

 बुलढाणा, प्रतिनिधी: केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासन मार्फत १९ ते २४ डिसेंबर दरम्यान ‘सुशासन सप्ताह-प्रशासन गॅंाव की ओर’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागामार्फत ५,३०१ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

 या मोहिमेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या मोहिमेंतर्गत तालुकास्तरावर व गावस्तरावर एकूण ९१ शिबीरे आयोजित करण्यात आले होते. या मोहिमेत राज्य सरकारच्या आपले सरकार तक्रार पोर्टलवरील २४२ आणि शिबिरात प्राप्त ३४७ असे एकूण ५८९ तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले. या मोहिमेंतर्गत लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यात जन्म-मृत्यू दाखला,जात दाखला, उत्पन्न दाखले, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ इत्यादी लाभाचे वितरण करण्यात आले.

 या मोहिमेत जिल्हा प्रशासनासह उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हा परिषद, विविध प्रशासकीय विभाग आणि ग्रामपंचायतींनी तालुका व गावस्तरावर शिबिरांचे आयोजन करुन पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित केले. 000

संबंधित पोस्ट

खोट्या बिलांद्वारे रू. ६४.०६ कोटीच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून अटक..

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी! मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची वर्णी…

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्गातील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती! हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे संघटन निर्माण करू ! – श्री. नितेश राणे, मंत्री, मत्स्य व्यवसाय

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता दूर करून समाजात समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवनिमित्त महिला सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची इतरांसाठी प्रेरणादायी विशेष लेखमालिका क्रमश:

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागात १०८ अनधिकृत हॉटेल आणि ८१ लॉजिंग-बोर्डिंगवर कारवाई- नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ