vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे..

५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे..

 

ठाणे प्रतिनिधी प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुढ व्हावा व सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. ०२ जानेवारी, २०२५ ते ०३ जानेवारी, २०२५या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, कळवा येथे आयोजित करण्यात आला आहे. विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असून या विषयानुरूप विद्यार्थ्यां मार्फत ११० प्रदर्शनीय साहित्याची मांडणी केली जाणार आहे.

 महानगरपालिका व तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाला पूरक असे विशेष प्राविण्य प्राप्त व समाजासाठी उपयुक्त असे प्रकल्प जिल्हा स्तरावरील प्रदर्शनामध्ये मांडणी केले जाणार आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व पालक यांनी या विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन नवीन संकल्पना व प्रतिकृतींची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

 या प्रदर्शनात इयत्ता ०६ वी ते १२ वी वर्गातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. माध्यमिक, प्राथमिक, आदिवासी, दिव्यांग, शिक्षक, प्रयोगशाळा परिचर या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. जिल्हास्तरासाठी निवड झालेल्या सर्व शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे.

अन्न, आरोग्य आणि स्वच्छता (A Food, Health and Hygiene), वाहतुक आणि दळणवळन (Transport And Communication), नैसर्गिक शेती (Natural Farming), आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार (Mathematical Modeling and Computational Thinking), कचरा व्यवस्थापन (Waste Management), संसाधन व्यवस्थापन (Resource Management) या विषयावरील प्रदर्शनामध्ये ११० प्रदर्शनीय साहित्याची मा.000

संबंधित पोस्ट

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘जन सेहत सेतू’ शिबीराचे व पोर्टलचे लोकार्पण‘निरोगी, समृद्ध व विकसित भारत’ संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी -डॉ. मनसुख

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न*’रामराज्या’च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे हजारो भाविकांची उपस्थिती*भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी घेतला ऑनलाईन लाभ!*

vishwatmaklokswamivarta

अग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली नवी मुंबई क्षेत्राची पावसाळी पाहणी