vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

ठाणे : प्रतिनिधी- मौजे भाईंदरपाडा(गायमुख )येथील ठाणे महापालिकेच्या जागेवर विकसित होत असलेल्या एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीन द्वारे ओल्या कचऱ्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे महापालिका हद्दीतील विकास कामांच्या पाहाणी दौऱ्याच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्या बरोबर महापालिका आयुक्त सौरभ राव व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मौजे भाईंदरपाडा येथे ठाणे महापालिकेची सुमारे 4190 चौ.मी. क्षेत्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सध्या या जागेतील 1/3 जागेवर 90-100 टनांपर्यंत प्राप्त झालेल्या ओल्या कचऱ्यापासून पासून एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीन द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खतांची निर्मिती प्रकल्प सुरू आहे. उर्वरित जागेवर हा प्रकल्प विस्तारित करण्यात येणार असून सुमारे 300 टनांपर्यंतचा घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

Lahs Green India Pvt Ltd. SOLARISED CONTROL WINDROW COMPOSTING (IIT PAWAI, MUMBAI PATENTED) technology द्वारे अशा प्रकारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राबविणारी ठाणे महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरणार आहे. या जोडीला Enviro Invent System Pvt. Ltd या कंपनीने बनविलेले Treatment Of The Waste On The Go (TOWGO vehicle) वाहनाद्वारे जागेवर एकावेळी सुमारे 2 टन ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करण्यात येते, अशी लवकर अजून 20 वाहने उपलब्ध होत आहेत.

या पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख श्री.कान्होजी आंग्रे यांचे यथोचित स्मारक विकसित होत असलेल्या नांगला बंदराची देखील पहाणी केली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या प्रत्येक आगरी-कोळी कुटुंबांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करण्यात यावे!” असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महापालिका क्षेत्रातील विकास कामांला अडथळा ठरणाऱ्या अन्य जागेवरील अतिक्रमण निर्मूलन तातडीने करुन घ्यावे अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.00000

संबंधित पोस्ट

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

अक्षय्य तृतीयेला बालविवाह होणार नाही याकरिता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी किशन जावळे

भूमीपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास करणे,ही शासनाची भूमिका आहे-परिवहन मंत्री श्री.प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

रस्त्यावरील खडयामुळे अपघाताने मृत्यु झाल्यास आता कुटुंबाला 6लाख रुपये मिळणार-प्रा.डॉ.जयपाल पाटील

vishwatmaklokswamivarta

माओवाद्यांना हिंसेचा त्याग करून शस्त्रे खाली ठेवून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सन्मानाचे जीवन जगण्याचे पोलीस महासंचालक, म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगाम 2025 पिकस्पर्धा; अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी 31 डिसेंबर अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta