vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निराधार वृद्ध आजी आजोबांना वृद्धाश्रमाचा आधार-वृद्धाच्या मदतीला धावून आले सामाजिक कार्यकर्ते…

निराधार वृद्ध आजी आजोबांना वृद्धाश्रमाचा आधार-वृद्धाच्या मदतीला धावून आले सामाजिक कार्यकर्ते…

 

चिखली प्रतिनिधी- मेहकर तालुक्यातील एका गावातील वयोवृद्ध आजी आजोबा यांना तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून दिला आश्रय

सविस्तर असे कि सदर आजी आजोबा यांना मुल मुली असून सुद्धा त्यांना कोणीही सांभाळ करू शकत नाही असे सुरेशअप्पा हाव व परसराम अंभोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते हिम्मतरावं जाधव, मनोज जाधव, पत्रकार भरत जोगदंडे, दीपक साळवे, राहुल गवई व मच्छिन्द्र मघाडे यांना सांगितले तेव्हा यांनी ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे. येथे असलेल्या निराधार वृद्धाना चांगल्या प्रकारचे भोजन, उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक सेवा देऊन मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे असे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना बोलावून सदर आजी आजोबांची हकीकत सांगून त्यांना प्रवेशित करण्याची विनंती केली त्यावर क्षणाचा हि विलंब न करता वृद्धाश्रम च्या नियमानुसार प्रवेश अर्ज भरून चिखली पोलिसात माहिती देऊन आजी आजोबांना वृद्धाश्रमात आश्रय मिळून दिला आहे. यावेळी चिखली पोलिसांनी विशेष सहकार्य केले. वृद्ध आजीआजोबा ना सामाजिक कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमात आश्रय दिल्याने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट

धारावी पोलिस ठाण्याचा वर्धापन दिन या निमित्ताने धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायत बीट दोन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू बिडकर यांचा जाहीर सत्कार

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

vishwatmaklokswamivarta

१०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

राज्यात 99.26 टक्के ऊस उत्पादकांना एफआरपी अदा;उर्वरित 298 कोटी व्याजासह वसूल करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजामाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्‍या प्रत्‍यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्‍पादन शुल्‍क खात्‍याचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta