vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार…

 

राज्य प्रतिनिधी-मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार असल्याची माहिती, पानिपत शौर्य समितीचे आयोजक प्रदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री. पाटील यांनी सांगितले, राज्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस प्रथमतःच हरियाणा राज्यात असलेल्या पानिपत येथील शौर्य स्मारकाला 14 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात येणार आहेत.

14 जानेवारीला पानिपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाले आहेत. वर्ष 1761 मध्ये झालेल्या अब्दाली आणि मराठ्यांच्या ऐतिहासिक युद्धातील वीरगती प्राप्त मराठ्यांच्या शौर्याचं स्मरण करण्यासाठी 14 जानेवारीला पानिपत येथे शौर्य स्मारक दिन साजरा केला जातो. मागील 19 वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाला यंदा राज्याचे मुख्यमंत्री प्रथमच उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. यासह केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव आणि राज्यातून इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

…असे असेल आयोजन!

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली, आणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहतील. यंदा ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक विशेषतः या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती आयोजकांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करा- मंत्री डॉ. अशोक वुईके

…पुढील ३ तासात मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींसह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळीवारे वाहण्याची दाट शक्यता… हवामान खात्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमरेड येथे सौर व हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन

वृत्त विशेष- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेत लातूर विभागातील चार बसस्थानकांची उत्कृष्ट कामगिरी

vishwatmaklokswamivarta

कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात १८-१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta