vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी-प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी-प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

 

            बुलडाणा प्रतिनिधी- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी, 2025 अशी आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – 32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचेनमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरस्कारांची माहिती

अ.क्र-पुरस्काराचे नाव पारितोषिक

1]अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)

2.बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)3.अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)4.बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

5.मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)6.यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

7.पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)8.तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

9.केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

10.समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)11.स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)12.पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार13.दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)51 हजार रुपये(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)14.अनंतराव भालेराव पुरस्कार, (औरंगाबाद आणि लातूर विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)15.आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)16.नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)17.शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)18.ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)19.लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)20.ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

संबंधित पोस्ट

जरंडेश्वर उपकेंद्रातून 33 केव्ही नेर उपसा सिंचन योजनेवरील वाहिनी आज होणार कार्यान्वित नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

प्रशासनिक विभागांनी शासकीय कार्यालयांची  जनमाणसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा आढावा बैठकीत दिले निर्देश

सोयाबीन, कापूस, संत्राचे तत्काळ पंचनामे करावेत  – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात शुक्रवारी रोजगार मेळावा व मार्गदर्शन सत्र> नामांकीत कंपन्यात नोकरीची संधी> थेट मुलाखतीने निवड> विदेशातील रोजगार संधी व पीएम इंटर्नशिपविषयी मार्गदर्शन मिळणार

रेणापूर शहर मंडळ भाजपा किसान मोर्चा ओबीसी मोर्चा कार्यकारिणी जाहीर,हारवाडी गावचे उपसरपंच श्री. किरणजी इंगळे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश…

vishwatmaklokswamivarta