vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शहापूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’म्हणून साजरा

शहापूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’म्हणून साजरा

 

ठाणे, प्रतिनिधी):- शहापूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रविवार, दि.12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जयंती दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

जिल्ह्यातील विविध युवकांच्या कौशल्यांना व गुणांना वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावे, यासाठी या संस्थेतून व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या व यशस्वी उद्योजक म्हणून नावरुपास आलेल्या माजी प्रशिक्षणार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सन 2024-25 मधील संस्थेतील, तंत्रप्रदर्शन, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास शहापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा श्रीमती गायत्री भांगरे, संस्थेचे आय.एम.सी. चे सदस्य श्री.संतोष निवळकर, श्री.दिनेश वाघ, संस्थेचे प्राचार्य श्री.रा.अ.हिरे, व्याख्याते श्री.उन्मेश गजरे व श्री.सदानंद जाधव तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी, संस्थेतील आजी व माजी प्रशिक्षणार्थी, पालक उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

आधुनिक चित्रनगरी उभारणीने नाशिकच्या आर्थिक, सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार तज्ज्ञ सल्लागारांच्या अहवालानंतर व्यवहार्यता तपासून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मराठी भाषा संवर्धनासाठी दैनंदिन जीवनात प्राधान्याने मराठीचाच वापर करावा – अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार

vishwatmaklokswamivarta

देशभक्तीच्या प्रकाशात चमकला के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा 66वा वर्धापनदिन..! जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा अखंड 30 वर्षांचा प्रेरणास्त्रोत’शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग संपन्न..!

vishwatmaklokswamivarta

पांढऱ्या काठीमुळे दृष्टीहीनांना शारीरिक सुरक्षितता, आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे – पांढरी काठी दिनानिमित्त दिला अंध व्यक्तिला आधार

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका माटुंगा बीएमसी एफ/उत्तर वॉर्डने बेकायदेशीर दुकानांवर कारवाई केली: ५२ अतिक्रमणे हटवली.

vishwatmaklokswamivarta

विविध कृषि पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ