vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

क्रीडा पुरस्कार 2023-24 साठी-26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्जमागणी..

क्रीडा पुरस्कार 2023-24 साठी-26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्जमागणी..

 

 

            सांगली, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाव्दारा देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांसाठी 26 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षी करिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान येतात.

 यासाठी अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (scrolling link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर दि. 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत व दि. 26 जानेवारी 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

अभिमानाचा क्षण! 🇮🇳🏆सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या Asian Lacrosse Championship स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले! 🥇

क्रीडा शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

तळा, श्रीवर्धन, म्हसळा आणि रोहा येथील क्रीडा संकुलांच्या विकासकामांमध्ये स्थानिक खेळाडूंच्या गरजा आणि त्या-त्या तालुक्यातील लोकप्रिय खेळांचा विचार करूनच नियोजन करण्यात यावे. तसेच प्रशासकीय मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पुढील १० ते १२ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी,मंत्री आदिती तटकरे

CISCE रिजनल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वसंत विहार शाळेचा झेंडा* 14 वर्षाखालील मुलींची संपूर्ण टीम नॅशनलसाठी सिलेक्ट..

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन