vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

CISCE रिजनल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वसंत विहार शाळेचा झेंडा* 14 वर्षाखालील मुलींची संपूर्ण टीम नॅशनलसाठी सिलेक्ट..

CISCE रिजनल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वसंत विहार शाळेचा झेंडा* 14 वर्षाखालील मुलींची संपूर्ण टीम नॅशनलसाठी सिलेक्ट..

ठाणे प्रतिनिधी- शालेय क्रिकेटमध्ये मानाची स्पर्धा असलेल्या कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन् अर्थात CISCE टुर्नामेंटसाठी ठाण्यातील वसंत विहार शाळेच्या आणि भांडुपच्या पवार पब्लिक स्कूलच्या 14 वर्षाखालील मुलींचा समावेश असलेल्या झोन सी संघाने झोन इ संघाचा अंतिम सामन्यात दारुण पराभव करत ठाण्याचे नाव मोठे केले. हे सामने पुण्यातील कॅम्प येथील बिशप हायस्कूल येथे पार पडले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही अंडर 14 ची संपूर्ण टीम आता नॅशनल साठी सिलेक्ट झाली असून पुढच्याच आठवड्यात उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे खेळायला जाणार आहे.

   या बाबत सविस्तर माहिती अशी की, शालेय क्रिकेटमध्ये मानाची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन् अर्थात CISCE टुर्नामेंट नुकतीच पुण्यात पार पडली. या टुर्नामेंट मध्ये झोन सी रिजनमधून ठाण्यातील वसंत विहार शाळेच्या 11 तर भांडुप येथील पवार पब्लिक स्कूलच्या 6 मुलींची निवड झाली होती. मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी पुण्यातील कॅम्प परिसरात बिशप हायस्कूल येथे या राज्य पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत झोन सी संघाने साखळी सामन्यात विजय मिळवून अंतिम सामना गाठला. झोन सी संघाविरुद्ध झोन इ संघाचा अंतिम सामना झाला. या सामन्यात झोन सी संघाने प्रथम फलंदाजी करत 12 ओव्हर मध्ये 2 विकेटच्या बदल्यात 110 धावा केल्या. या 110 धावांचा पाठलाग करताना झोन इ संघ अक्षरशः ढेपाळला. अवघ्या साडेसहा ओवर मध्ये अख्खा संघ गारद होत त्यांनी कशाबशा अवघ्या 19 धावा केल्या. झोन सी संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर यष्टिरक्षक कु. काव्या पष्टे हिने चमकदार कामगिरी करत तब्बल सहा खेळाडूंना यष्टीचीत केले. ती या सामन्याची प्लेअर ऑफ मॅच ठरली. तर कर्णधार कु. दिलीशा आंगचेकर हिने सर्वाधिक वीस धावा केल्या तर गोलंदाज कु. गौतमी मोरे हिने अवघ्या 1.3 ओव्हर मध्ये 5 धावा देत 3 विकेट मिळवून बेस्ट बॉलर ठरली.

 या संघाचे मुख्य प्रशिक्षक किरण साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोच प्रशांत मोरे आणि स्वाती पाटील यांनी केलेल्या नियोजनामुळे हा विजय मिळवता आल्याचे सांगितले जात आहे. राज्यपातळीवरील CISCE सारखी मानाची क्रिकेट स्पर्धा जिंकल्याने वसंत विहार शाळा आणि पवार पब्लिक स्कूलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आनंदाचा डबल धमाक,एकीकडे 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने CISCE रिजनल क्रिकेट ही मानाची स्पर्धा जिंकल्याचा आनंद व्यक्त होत असताना दुसरीकडे हा संपूर्ण संघ आता नॅशनल साठी सिलेक्ट झाला आहे. येत्या 14 ते 16 सप्टेंबर रोजी हे सामने उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे होणार आहेत. या स्पर्धेत या मुली महाराष्ट्राच्या अंडर 14 संघाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे वसंत विहार हायस्कूल आणि मुख्य प्रशिक्षक किरण साळगावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संबंधित पोस्ट

जागतिक कौशल्य स्पर्धा नामांकनासाठी स्किल कॉम्पीटीशन

vishwatmaklokswamivarta

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

मल्लखांब खेळातून मानसिक, शारीरिक संतुलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा उत्साहात सुरू

vishwatmaklokswamivarta

खरपुडी येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

महादेवा’ योजनेअंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणी;निवडलेल्या खेळाडूंना लिओनेल मेस्सीसमवेत खेळण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 भारतीय पॅरा ॲथलीट्सची सुवर्ण कामगिरी!वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२६’ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.पुरुषांच्या उंच उडीत भारताला दोन सुवर्णपदके