vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कुटुंबाचा सामाजिक उपभोग:आरोग्य’ सर्व्हेक्षण-सर्व्हेक्षण

कुटुंबाचा सामाजिक उपभोग:आरोग्य’ सर्व्हेक्षण-सर्व्हेक्षण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून राष्ट्रीय नमूना पाहणी ८० वी फेरी ‘कुटुंबाचा सामाजिक उपभोग:आरोग्य’ या विषयावर देशव्यापी पाहणी घेण्यात येत आहे. पाहणी जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घेण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्याकरीता अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग या पाहणीमध्ये सहभागी होत आहे.

  या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आरोग्य क्षेत्राविषयी मुलभूत सांख्यिकी माहिती निर्माण करणे, शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचे मोजमाप करणे, सरकारी रुग्णालयांचा वापर किती प्रमाणात होतो, सरकारी व खासगी क्षेत्रातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, लसीकरण तसेच १५ ते ४९ वयोगटातील गरोदर महिलांसाठी गर्भावस्थेच्या पूर्व आणि पश्चात घेतलेल्या उपचारांबाबत तपशिलवार माहिती या सर्वेक्षणाच्या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. पाहणीची माहिती शाश्वत विकास ध्येय अंतर्गत महत्वाचे निर्देशक तयार करण्यासाठी आणि पाहणीचे निष्कर्ष केंद्र व राज्य शासनाला नियोजन व ध्येयधोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे प्रशिक्षित कर्मचारी या पाहणीकरीता माहिती गोळा करत आहेत. हे कर्मचारी शास्त्रोक्त पद्धतीने निवडलेल्या गावांना आणि शहरी भागांना भेट देतात. या भेटीदरम्यान सांख्यिकी पद्धतीचा वापर करुन निवडण्यात आलेल्या कुटुंबाकडून माहिती गोळा करण्यात येत आहे. पाहणी दरम्यान कुटुंबाची संकलित केलेली वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

 या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे आणि त्यांना योग्य व परीपूर्ण माहिती देण्यासाठी वेळ द्यावा असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक प्रादेशिक कार्यालय म.श. दुशिंग यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

नेत्रदानाच्या चळवळीत सहभाग नोंदवा- अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभिषन सारंगकर

मानसिक आरोग्य आढावा मंडळावरअशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश..

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन #सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रमसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि #युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन..

vishwatmaklokswamivarta

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलढाण्यात ‘नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती मोहीम

समुदाय स्तरावरील उद्दिष्टे, कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन काम करावे – सार्वजनिक आरोग्य सचिव निपुण विनायक

आरोग्यविषयक सर्वेक्षणाची माहिती-देवून सहकार्य करण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta