vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा 1 मार्च रोजी शुभारंभ

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा 1 मार्च रोजी शुभारंभ

 

 आरोग्य प्रतिनिधी- सातारा  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहिम स्वरुपात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल सातारा येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.युवराज करपे यांनी दिली आहे.

 ० ते १८ वर्षे पर्यतच्या बालकांची / किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे. आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे. गरजु आजारी बालकांना संदर्भसेवा जसे की, औषधोपचार, शस्त्रक्रीया देऊन उपचार करणे. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या मोहिमेच्या तपासणी पथकामध्ये पुरुष व महिला वैदयकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, ए.एन.एम यांचा सामावेश आहे. तपासणी मध्ये उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रीया आवश्यक असलेल्या बालकांना शासकीय वैदयकीय महाविद्यालय, मनपा रुग्णालय, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत करारबध्द रुग्णालय व आरबीएसके करारबध्द रुग्णालया मध्ये संदर्भीत करण्यात येणार आहे.

शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे आदी उपस्थित राहणार आहेत

0000

संबंधित पोस्ट

बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात 20 मार्च रोजी-मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानगुरुवारी रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन

vishwatmaklokswamivarta

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष- उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळेदोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच..

मिरजचे शासकीय उपचार केंद्र बजावणार व्यसनमुक्ती चळवळीत मोलाची भूमिका

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या सहाय्याने बालकाची यशस्वी शस्त्रक्रिया

हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान कालावधीत प्रभावी आयोजन