vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा-टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे…

 

मुंबई प्रतिनिधी-टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा वाढविणारी, बंधुभाव वाढविणारी, माणसं जोडणारी ही मॅरेथॉन प्रत्येकाला आकर्षित करणारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली ही मॅरेथॉन उत्कृष्टता आणि सामुदायिक भावनेला मूर्त स्वरूप देते. ही मॅरेथॉन ऊर्जेचा स्रोत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला उपस्थित राहून शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आयोजक, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्पर्धक उपस्थित होते. श्री. भरणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली.

मंत्री श्री. भरणे म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या प्रत्येकाला वर्षभर सकारात्मक ऊर्जा मिळते. इथं मिळणारं हे प्रेम आणि आनंद शब्दात व्यक्त करता येणं शक्य नाही. मुंबई मॅरेथॉनच्या हजारो स्वयंसेवकांची पाणी, एनर्जी ड्रिंक्स, रिलिफ स्प्रे, फळं देण्यासाठी सुरू असलेली धावपळ वाखाणण्याजोगी असते. आपल्या शरीराची आणि मनाची सलग धावण्याची क्षमता आहे, याची प्रचिती आल्याने अभिमान वाटतो. टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या या उत्सवात सहभागी होऊन प्रत्येकानं आनंद घेतला पाहिजे.

संबंधित पोस्ट

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबाग तालुक्यातील मतदान,मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला दिली भेट*

vishwatmaklokswamivarta

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन“एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन

संविधान अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम; 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान शिबीराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जि.प.हायस्कूल विष्णुपूरी येथे भेट देऊन केले विद्यार्थ्याचे स्वागत

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या ‘शौर्य व सेवा पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta