vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

           जालना, प्रतिनिधी- योग्य औषधोपचाराने कुष्ठरोग संपुर्णत: बरा होतो. नागरिकांच्या मनातून कुष्ठरोग रुग्णाविषयीची भिती घालविण्यासाठी स्पर्श -कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे आयोजन जिल्ह्यात दि.30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यात स्पर्श -कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत स्पर्श -कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस कुष्ठरोग आरोग्य सेवेचे सहाय्यक संचालक डॉ.सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे, निवासी वैद्यकीय अधिकारी एस.ए.सोनी, यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले, कुष्ठरोग रुग्णाचे निदान वेळेत होण्यासाठी स्पर्श -कुष्ठरोग जनजागृती अभियानात आशा सेविकांचा समावेश करण्यात यावा. कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम व्यवस्थितपणे राबवून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात यावेत. या अभियानाच्या माध्यमातून तालुकास्तरावर नवीन आयुष्यमान कार्डही काढण्यात यावेत. अशी सुचनाही त्यांनी केली.

शाळेतील विद्यार्थ्यांना सपना नावाची व्हिडीओ क्लिप दाखविण्यात येणार आहे. जिल्ह्यात दि.26 जानेवारी रोजीच्या ग्रामसभेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कुष्ठरोग विषयक संदेश देण्यात येवून जनजागृतीपर अभियानाच्या माहितीसह जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या कुष्ठरोगाबाबतच्या आवाहनाचे वाचनही केले जाणार आहे.

ग्रामसभेतच कुष्ठरोग उपचारासंबंधी माहिती देवून उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात मोफत मिळतात याचा संदेश दिला जाणार आहे. कुष्ठरोग पंधरवाड्यात शाळेतील प्रार्थनेनंतर कुष्ठरोगाबाबतच्या प्रतिज्ञाचे वाचन करण्यात येणार आहे. सर्व शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोगाबाबत संदेश देण्यात येणार आहे. शाळेमध्ये चावडीनाटक, प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा, कटपुथली, ‍चित्रकला स्पर्धा, पथनाट्य व कुष्ठरोगावरील म्हणी व घोषवाक्य स्पर्धा आदि कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच कुष्ठरोग मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. स्थानिक महिला मंडळ, बचतगट, तरुण मंडळ यांच्या सभा घेण्यात येणार आहेत. खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांच्या कार्यशाळा तसेच बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे. याप्रमाणे विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती बैठकीच्या सुरुवातीस कुष्ठरोग आरोग्य सेवेचे सहाय्यक संचालक डॉ.सुधाकर शेळके यांनी दिली. या बैठकीस गटविकास अधिकारी, लायन्स व रोटरी संस्थेचे प्रतिनिधी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आशा समन्वयकसह आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण, जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.*-*-*-*-

संबंधित पोस्ट

श्री सेवागिरी प्रदर्शनात कृषि विभागाचा स्टॉल ठरतोय आकर्षण*

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह नांदुरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

vishwatmaklokswamivarta

कॉटन असोसिएशन इंडियाच्यावतीने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे  वाटप

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी मानधन योजनेच्यालाभासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करावा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे         

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन