vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी,सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी,सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

 

            जालना, प्रतिनिधी:- सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाकडून राष्ट्रीय नमुना पाहणी 80 वी फेरी कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी घेण्यात येत आहे. ही पाहणी जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत घेण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. तरी या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली योग्य ती परिपुर्ण माहितीसह वेळ देवून सहकार्य करावे, असे आवाहन उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आरोग्य क्षेत्राविषयी मुलभुत सांख्यिकी माहिती निर्माण करणे, शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचे मोजमाप करणे, सरकारी रुग्णालयाचा वापर किती प्रमाणात होतो, सरकारी व खाजगी क्षेत्रातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, लसीकरण तसेच 15 ते 49 वयोगटातील गर्भवती महिलांसाठी गर्भावस्थेच्या पूर्व आणि पश्चात घेतलेल्या उपचारांबाबत तपशिलवार माहिती या सर्वेक्षणाच्या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. या पाहणीची माहिती शाश्वत विकास ध्येय अंतर्गत महत्वाचे निर्देशक तयार करण्यासाठी आणि पाहणीचे निष्कर्ष केंद्र व राज्य शासनाला नियोजन व ध्येय धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षीत कर्मचारी शास्त्रोक्त पध्दतीने निवडलेल्या गावांना आणि शहरी भागांना भेट देतील. पाहणी दरम्यान कुटुंबाची संकलित केलेली वैयक्तिक माहिती पुर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

भरडखोल येथे 137.22 कोटीच्या मत्स्यबंदर विकासकामाचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तर खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली भूमीपूजन संपन्न2 वर्षात विकसित बंदराचे लोकार्पण करणार; मच्छिमार बांधवांची आर्थिक समृद्धी होणार- मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे*

🌸 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – आधार प्रमाणीकरण (e-KYC) बाबत महत्त्वाची माहिती 🌸

vishwatmaklokswamivarta

डिजीटल युगात विद्यार्थ्यांची मातीशी व संस्कृतीशी नाळ तुटू देऊ नका- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता. पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज (IMD)

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचे कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत…

vishwatmaklokswamivarta