vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

गरजू दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी होण्याच्या योजनेचा-लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

गरजू दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी होण्याच्या योजनेचा-लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 

ठाणे, प्रतिनिधी:- सन 2024-25 करिता दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दि.10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्यादित यांच्या स्तरावरुन सुरु आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे तसेच सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रस्तुत योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल दि.22 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींनी या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज दि.06 फेब्रुवारी 2025, सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित, मुंबईचे (महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम) जिल्हा व्यवस्थापक, ठाणे यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

ठाणे शहराला वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसे पाणी मिळण्यासाठी नियोजन- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

बुलढाण्यात ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ २०२६’ महोत्सव; उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळी सी फेसवर ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोताळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक पदाची भरती

vishwatmaklokswamivarta

59 महसूल मंडळांत ‘महाराजस्व समाधान शिबिर; ‘एकाच ठिकाणी मिळणार सर्व लाभ’**संधीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

धारावी की जंक्शन ते धारावी खाडी कलानगर भर रस्त्यात अस्वच्छता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देतील का?

vishwatmaklokswamivarta