vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

59 महसूल मंडळांत ‘महाराजस्व समाधान शिबिर; ‘एकाच ठिकाणी मिळणार सर्व लाभ’**संधीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

*59 महसूल मंडळांत ‘महाराजस्व समाधान शिबिर; ‘एकाच ठिकाणी मिळणार सर्व लाभ’**संधीचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

गडचिरोली प्रतिनिधी : सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवरच निकाली काढण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ५९ महसूल मंडळांमध्ये हे अभियान पार पडणार असून, नागरिकांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज पत्रकार परिषदेतून केले.

जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, महसूल प्रशासनाने या अभियानाचे सुटसुटीत नियोजन केले असून, सर्व तालुक्यांमध्ये ७ मार्चपासून या शिबिरांना सुरुवात होणार आहे. त्यानंतर १४ मार्च, १० एप्रिल, १७ एप्रिल, २४ एप्रिल, ८ मे, १५ मे या नियोजित तारखांना महसूल मंडळनिहाय ठिकठिकाणी ही शिबिरे आयोजित केली जातील. विशेषतः धानोरा आणि एटापल्ली या तालुक्यांचा भौगोलिक विस्तार मोठा असून तिथे सहापेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या दोन तालुक्यांसाठी अतिरिक्त शिबिराचे आयोजन केले आहे, जेणेकरून दुर्गम भागातील एकही नागरिक लाभापासून वंचित राहणार नाही.

या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ‘एकाच ठिकाणी सर्व लाभ’ देणे हे आहे. यामध्ये महसूल विभागाशी संबंधित सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी, विविध प्रकारचे दाखले (उत्पन्न, जात, अधिवास), रेशन कार्डाशी संबंधित कामे आणि संजय गांधी निराधार योजनेसारख्या कल्याणकारी योजनांचे अर्ज जागीच निकाली काढले जाणार आहेत. जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की, अनेकदा तांत्रिक कारणांमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहतात. ही शिबिरे अशा सर्व अडचणी दूर करून पारदर्शक पद्धतीने सेवा देण्यासाठी आयोजित केली आहेत.

प्रशासन स्वतःहून जनतेपर्यंत पोहोचत आहे, ही नागरिकांसाठी मोठी संधी आहे. आपल्या गावाजवळील महसूल मंडळात होणाऱ्या या शिबिरामध्ये, आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

अतिरेक्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*प्रधानमंत्री मोदींची विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही*

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

राज्यातील सर्व शाळा मॉडेल स्कूल करण्याचा प्रयत्न– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ‘चला शाळेत जाऊया’ उपक्रमांतर्गत शाळांना भेटी; विद्यार्थ्यांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शिवचरित्र पारायण

vishwatmaklokswamivarta