vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शिवचरित्र पारायण

जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे शिवचरित्र पारायण

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद ठाणे)- छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र ऐकणे म्हणजे जीवन जगण्याला मोठी ऊर्जा मिळते. शिवरायांचे आचार, विचार, पराक्रम, रयतेवरील राजाचं प्रेम, युद्ध तंत्र, या सर्व गोष्टी आपल्याला प्रचंड ऊर्जा आणि आनंद देणाऱ्या आहेत त्यामुळे जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे शिवचरित्र पारायण सुरू करण्यात आले आहे.

 शाळेतील शिवचरित्र पारायणाचे हे चौथे वर्षे आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथे ३ फेब्रुवारी पासून शिवचरित्र पारायणाला सुरूवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आणि संतांची कामगिरी, कथा विद्यार्थ्यांसमोर कथन करून या कार्यक्रमाची सुरूवात केली आहे तर शिक्षक अंकुश ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांचा जन्म, प्रताप गडावरील पराक्रम, संध्या जगताप यांनी शिवरायांचे बालपण, चित्रा पाटील यांनी स्वराज्याची शपथ, तर माया सोनकांबळे यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ही कथा उत्कृष्टपणे सादर केले आहेत. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त, रसिका पाटील यांनी पन्हाळगडावरून विशालगडावर ही कथा मुलांना सांगितली.

    या उपक्रमाची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांची असून ३ फेब्रुवारीपासून सुरू झालेले शिवचरित्र पारायण १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मुलं अत्यंत तन्मयतेने या कथा ऐकत आहेत.‌ १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ढोल, ताशा, लेझीम च्या गजरात संपूर्ण गावातून राजांची मिरवणूक काढून शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

    विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी असे विशेष उपक्रम सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी घ्यावे, असे आवाहन यानिमित्ताने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे  शिवचरित्र पारायणावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा घेतली आहे. तसेच शनिवारी पावनखिंड हा चित्रपट दाखविला. या शिवचरित्र पारायणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.

000

संबंधित पोस्ट

जालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा 21 व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण; बुलढाणा कृषि विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन…

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन-जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे सहभागाचे आवाहन

ॲग्रीस्टॅक नोंदणी, शून्य प्रलंबितता कामे पूर्ण करा- जिल्हाधिकारी स्वामी

जालना जलकवच अभियानांतर्गत बदनापूर येथे रेशीम शेती कार्यशाळा संपन्न.