vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शिक्षण विभागाकडून ५२ शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ

शिक्षण विभागाकडून ५२ शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ

 

ठाणे प्रतिनिधी(जिल्हा परिषद ठाणे)- जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी (शिक्षण) वर्ग ३ श्रेणी ३ या पदासाठी केंद्रप्रमुख / मुख्याध्यापक / शिक्षक संवर्गातून ११ पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली व मुख्याध्यापक पदावर ४१ पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पदोन्नती देण्यात आली आहे.

  शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, अधीक्षक सारासे श्री. बी. ए. गोमासे, विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजारराव तसेच शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या विविध लाभाबाबत विशेष पाठपुरावा वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी घेत असल्याने शिक्षण विभागातील ५२ शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटना यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

000

संबंधित पोस्ट

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील अभोडा झरी गावासाठी टँकर मंजूर

१२ एप्रिल रोजी ठाण्यात पहिल्यांदाच ‘कोकणची लोकधारा’डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव

राष्ट्रीय एकता ग्रूप द्वारा संचालित एकता कोचिंग क्लास याचा गॅदरिंगसमारोह चा उद्घाटन माजी राज्य मंत्री व जालना जिल्ह्याचे लोक प्रिय आमदारअर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते.

vishwatmaklokswamivarta

अंबादास दानवे यांनी आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी“टेक वारी” उपक्रमाचे थेट प्रक्षेपणाद्वारे प्रशिक्षण संपन्न..