vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

सीआयडी चा अहवाल -वांद्रे येथील निवासस्थानातून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळले नाही, बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण..

 सीआयडी चा अहवाल -वांद्रे येथील निवासस्थानातून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळले नाही, बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण..

 

मुंबई प्रतिनिधी

-बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या, वांद्रे येथील निवासस्थानातून केलेले बोटांचे ठसे मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी शरीफुल इस्लामशी जुळत नाहीत. पोलिस सूत्रांचा हवाला देत अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) फिंगरप्रिंट ब्युरोने सिस्टीम-जनरेटेड अहवालात असे सिद्ध झाले आहे की खानच्या घरातून गोळा केलेल्या 19 बोटांच्या ठशांपैकी एकही बोटांचा ठसा शरीफुलशी जुळत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून शरीफुल इस्लामी या व्यक्तीला अटक केली होती

बोटांचे ठसे जुळले नाहीत -सीआयडीने चाचणीचे निकाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिल्यानंतर, मुंबई पोलिसांनी पुढील चाचणीसाठी आणखी नमुने पाठवले आहेत. सैफ अली खानच्या घराच्या पायऱ्यांवरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून आरोपीची ओळख पटवण्यासाठी 19 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी 30 वर्षीय शरीफुल इस्लामला अटक केली होती

.संशयिताच्या पोलिस कोठडीत वाढ –

आरोपीला वाढीव कोठडी देण्याची मागणी करत, मुंबई पोलिसांनी 24 जानेवारी रोजी वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तोच व्यक्ती आहे हे निश्चित करण्यासाठी शरीफुलचा चेहरा ओळखण्याची चाचणी घेणे आवश्यक आहे. शरीफुलच्या वडिलांनी असा दावा केला आहे की, हल्ल्यानंतर प्रसारित झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती त्यांच्या मुलासारखी दिसत नाही.

अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ला प्रकरणात  आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण, वांद्रे येथील निवासस्थानातून  गोळा केलेले बोटांचे ठसे मुंबई पोलिसांनी  अटक केलेल्या आरोपी शरीफुल इस्लामशी जुळत नाहीत. पोलिस सूत्रांचा हवाला देत अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) फिंगरप्रिंट ब्युरोने सिस्टीम-जनरेटेड अहवालात असे सिद्ध झाले आहे की खानच्या घरातून गोळा केलेल्या 19 बोटांच्या ठशांपैकी एकही बोटांचा ठसा शरीफुलशी जुळत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून शरीफुल इस्लामी या व्यक्तीला अटक केली होती

बोटांचे ठसे जुळले नाहीत -सीआयडीने चाचणीचे निकाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिल्यानंतर, मुंबई पोलिसांनी पुढील चाचणीसाठी आणखी नमुने पाठवले आहेत. सैफ अली खानच्या घराच्या पायऱ्यांवरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून आरोपीची ओळख पटवण्यासाठी 19 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी 30 वर्षीय शरीफुल इस्लामला अटक केली

000000

संबंधित पोस्ट

ग्लोबल चित्रपट निर्मितीसाठी ‘इंडिया सिने हब पोर्टल’चा वापर करण्याचा केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह; दुर्लक्षित भागात कमी खर्चातील चित्रपटगृहांच्या विकासासाठी रोडमॅपही सादर

आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना,इच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा

अर्थसंकल्प आणि महिला सक्षमीकरण : सर्वसमावेशक विकासाचा नवा आराखडा

दिव्यांग बांधवानी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पोलीस पाटील गिरीधर पाटील यांना मिळाला“विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार 2024”

जागतिक महिला दिनानिमित्त साताऱ्यात ‘महिला सन्मान बाईक रॅली’; हजारो महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग